मागील सप्ताहभरात राज्यातील ‘चौकश्याचा ससेमिरा मागील पानावरून पुढे चालू’ या सदराशिवाय शेतक-यांच्या मदतीचे दहा हजार कोटीचे पँकेज देण्याचा मायबाप सरकारचा निर्णय असे काही नेहमीच्या नोंदी घेण्यासारख्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे त्या ऐतिहासिक नोंदीची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्याहून दखल घ्यावी असा ऐतिहासिक क्षण अनुभवास आला आहे.
दसरा उजाडला मोरूचा बाप मोरूला म्हणाला
फार पूर्वी मराठी पाठ्यपुस्तकात मोरूचा दसरा नावाचा धडा असायचा ज्याची सुरूवात असे ‘दसरा उजाडला मोरूचा बाप मोरूला म्हणाला आणि शेवटी सोने लुटून मोरू आला, बहिण काशी ओवाळी त्याला असा असे. त्याच धर्तीवर सा-यांना अपेक्षीत असे दसरा मेळाव्याचे भाषण पक्षप्रमुखांनी ठोकले आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे!
या भाषणापूर्वी त्यांनी आणि त्यांचे सुपूत्र आदित्य साहेब यांनी मुंबई आणि राज्याच्या विकासात गेल्या दोन वर्षात (वर्षावर बसूनच) जी भरीव कामगिरी करत भर घातली आहे त्याची चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने जे काम केले ते अश्या एका चित्रफितीत मावेल इतके नाही! (म्हणजे व्यापक आहे या अर्थाने) असो. तर या ‘करून दाखवले’ चित्रफितीनंतर दसरा मेळाव्यात जो शिवसेनेच्या शैलीत विचारांचा गुलाल उधळण्यात आला त्यावरून मग फडणवीस, दरेकर, शेलार, वाघ इत्यादी चिरकुटे (हा पक्षप्रमुखांच्या भाषणातील शब्द) चिरकले आहेतच! पण पक्षप्रमुखांनी म्हटले तसे त्यांच्या मनात कोरोनाच्या काळात झालेल्या विचारांच्या गर्दीला मास्क घालणे त्यांना शक्य नव्हते. मग वडील आणि आजोबांच्या वारश्यातून आलेल्या शब्द संपत्तीमधील दोन चार शेलक्या शब्दानी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाच!
सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षात (वर्षावर) बसून देशात पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून सन्मान मिळविणा-या त्यांच्या कारकिर्दीत जे काही झाले ते केवळ सत्ता मिळवण्याचे व्यसन म्हणून नव्हे तर केवळ ‘दिल्या घेतल्या वचनांची पूर्तता’ आणि कर्तव्य पार पाडण्याचा आटापिटा होता हे देखील त्यांनी पोटतिडिकेने सांगितले. केवळ आम्ही तुमच्या पालख्या उचलत नाही म्हणून छापा – काटा खेळू नका आम्ही पालख्या उचलतो पण त्या देश, धर्म आणि समाजाच्या सेवेसाठी हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्याच वेळी पंजाब, बंगाल, आणि महाराष्ट्राने ७५ वर्षापूर्वी जे अमृतमंथन केले त्यातून हे स्वातंत्र्याचे कमळ फुलले आहे हे देखील ते सांगायला विसरले नाहीत. मात्र इंग्रज गेल्यानंतर त्यांच्या धोरणाने फोडाझोडा आणि राज्य करा हे पुन्हा चालू देणार नाही असेही त्यानी बजावले आहे. महाराष्ट्रात चीन मधून माघारी फिरणारी गुंतवणूक येण्याची संधी आणि शक्यता असताना या राज्याची कायदा सुव्यवस्था नाही असे म्हणत बदनामी केल्याने बेरोजगारीचे संकट येईल आणि युवाशक्तीला आकार दिला नाही तर ती व्यसनाधिनते कडे जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. म्हणजे शिलंगणाचे सोने म्हणून जे काय असते ते सारे विचार पेरण्यात आले.
या शिवाय केंद्र आणि राज्य यांच्यात संघराज्य व्यवस्था कशी असावी यावर खुली चर्चा परिसंवाद व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. राज्यांचे अधिकार कोणते ते त्यावर खुले अमृतमंथन होवून त्यातून जे नवनित समोर येईल त्यावर भविष्यात देशाचा प्रगती आणि विकास केंद्राने करावा की राज्याने ते स्पष्ट होणार आहे. गेल्या सहा महिने ‘हे सगळेच केंद्राला मागतात’ असे आरोप करणारे त्यामुळे अवाक झाले आहेत. कारण आता नेमके केंद्राने अधिकार आणि राज्याचे अधिकार समजले की कुणी काय करायचे असते ते स्पष्ट होणार आणि मग केंद्राने हे द्यावे ते द्यावे असे करावे तसे करावे असे पालुपद कुणी गाणार नाही! यालाच शिलंगणाचे सोने आणि अमृत महोत्सवी अमृत मंथन म्हटले आहे!
जाता जाता मराठी तितुका मेळवावा आणि हिंदु धर्म वाढवावा असा समर्थ रामदासांच्याही पलिकडचा मंत्र (नारा) देण्यात आला आहे. ज्याच्या व्यापकतेसमोर देशाच्या गत वैभवासोबतच भविष्याच्या परम वैभवाचा वेध घेण्याची शक्ति सामावली आहे हे लक्षात येते. अश्या या हिंदुत्वा पासून राजयोगा पर्यंत आणि संविधाना पासून जनराज्यातील रामराज्यापर्यंतच्या विचारांची श्रीमंती साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी साडेतीन पक्षांच्या सरकारचे नेतृत्व करत असताना आपल्यासमोर मांडण्यात आली आहे. ‘उडदा माजी काळे गोरे काय निवडती निवडणारे?’ त्यातील काय घ्यावे, निवडावे, आणि पाखडावे जे ज्याचे त्याचे पहावे. नाही का?
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/latest-news/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790.html”]
[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/latest-news/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]