Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : भारताचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८९४ मध्ये झाला होता. त्यांनी १९६९ ते १९७४ च्या कालवधीत भारताचे चौथे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. ते भारताचे पहिले आणि एकमेव राष्ट्रपती जे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण जीवन वेतले. त्यांच्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील योगदाना अत्यंत महत्त्व दिले जाते. यासाठी त्यांना १९७५ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळतही आणि कामदार चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. २४ जून १९८० रोजी चेन्नई येथे त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने देशाने एक महान राष्ट्रनेता गमावला.
मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ आणि रुबाबदार अभिनेते नानासाहेब फाटक यांचा जन्म २४ जून १८९९ रोजी झाला होता. प्रभावी संवादकर्ते, धीरगंभीर आवाज आणि देखणे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रक्षाबंधनमधील गिरीधर, एकच प्याला मधील सुधाकर, झुंजारराव आणि हॅम्लेट या भूमिका आजही लोकांच्या पसंतीस पडतात. त्यांना देशभरातल्या सर्वोत्कृष्ट नटाच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. मुखवट्याचे जग हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. त्यांच्या मराठी रंगभूमीवरील योगदानाचे अत्यंत महत्त्व आहे.
24 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
24 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1881 : ‘पं. श्रद्धाराम शर्मा’ – लोकप्रिय आरती ओम जय जगदीश हरे निर्माता यांचे निधन.
1908 : ‘ग्रोव्हर क्लीव्हलँड’ – अमेरिकेचे 22वे आणि 24वे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1837)
1997 : ‘संयुक्ता पाणिग्रही’ – ओडिसी नर्तिका यांचे निधन. (जन्म: 24 ऑगस्ट 1944)
2013 : ‘एमिलियो कोलंबो’ – इटलीचे 40वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1920)
1980 : ‘वराहगिरी वेंकट गिरी’ – भारताचे चौथे राष्ट्रपति यांचे निधन.






