नागपूर (Nagpur). विदर्भातील (Vidarbha) कोरोनासह (Corona) म्युकर मायकोसिसचे (mucosalmycosis) (काळी बुरशी) (black fungus) सर्वाधिक रुग्ण (Patient) व मृत्यू (Death) नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) नोंदवण्यात आले आहेत. नागपुरात कोरोनाच्या आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर १.५९ टक्के असतानाच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर सहा पट म्हणजेच ९.५७ टक्के आहे.
[read_also content=”Nagpur corona update नागपुरात शुक्रवारी आढळले ३० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; मृत्यूसंख्या शून्यावरच https://www.navarashtra.com/latest-news/30-corona-positive-patients-found-in-nagpur-on-friday-the-death-toll-is-zero-nrat-150116.html “]
जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ४ लाख ७७ हजार ५२ रुग्ण आढळले. त्यात शहरातील ३ लाख ३२ हजार ५१३, ग्रामीणचे १ लाख ४२ हजार ९३३, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६०६ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ९ हजार २५ रुग्णांचा (१.८९ टक्के) मृत्यू झाला. त्यात शहरातील ५ हजार २९५ (१.५९ टक्के), ग्रामीणचे २ हजार ३०६ (१.६१ टक्के), जिल्ह्याबाहेरील १ हजार ४२४ रुग्णांचा समावेश होता.
[read_also content=”नागपूर/ भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू; चार ठिकाणी होणार ‘क्लिनिकल ट्रायल’ https://www.navarashtra.com/latest-news/bharat-biotech-launches-kovacin-vaccine-on-young-children-clinical-trials-to-be-held-at-four-places-nrat-149943.html”]
जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ६७ हजार ६९१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यात शहरातील ३ लाख २७ हजार ३४४, ग्रामीणचे १ लाख ४० हजार ३४७ व्यक्तींचा समावेश आहे. हे कोरोनामुक्तांचे प्रमाण ९८.०४ टक्के आहे. जिल्ह्याबाहेरील येथे उपचाराला आलेल्या रुग्णांचा मृत्यू वगळता येथे रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.५९ टक्के आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे १ हजार ६०८ रुग्ण आढळले. त्यात शासकीय रुग्णालयातील ५९९ रुग्ण खासगी रुग्णालयातील १ हजार ४९ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांतील १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ३८ मृत्यू शासकीय रुग्णालयांत तर ११६ मृत्यू खासगी रुग्णालयांत झाले. हे मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात ९.५७ टक्के आहे. कोरोनाच्या तुलनेत म्युकरमायकोसिसच्या मृत्यूचे प्रमाण तब्बल सहा पट आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात म्युकरच्या १ हजार १९५ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया झाल्या. त्यातील ३७७ शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयांत तर ८१८ शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांतील आहेत. तर उपचारानंतर १ हजार १२७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. त्यात शासकीय रुग्णालयातील २९७, खासगी रुग्णालयातील ८३० रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णस्थिती
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ३३६ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात शहरातील २९२, ग्रामीणच्या ४४ रुग्णांचा समावेश आहे. म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात ३२७ सक्रिय रुग्ण असून त्यातील सर्वाधिक १७८ रुग्ण शासकीय रुग्णालयांत तर १४९ रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.