Mira Bhayander News : महासभेत करदरामध्ये फेरफार ; भाजपाला मिळाला घरचा आहेर
AIMIM पक्षातील फुटीबाबत चर्चांना उधाण आलं असताना AIMIM पक्षाचे आमदार मुर्शिद आलम यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी नितीश कुमार यांच्यासोबत कोणताही संपर्क नसल्याचं सांगितलं. पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अगोदरच स्पष्ट केल्याप्रमाणे मुख्यमंत्री सध्याच्या आघाडीतून बाहेर पडले आणि आमच्यासोबत युती केली तर त्याला पूर्ण पाठिंबा आहे.
AIMIMचे बिहार प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी यासगळ्या विषयावर काव्यात्मक पद्धतीने प्रतिक्रिया दिली. पक्ष सोडून गेलेल्यांची काय परिस्थिती झाली ही सर्वांनी पाहिली आहे. त्यांनी पुढे असाही दावा केला की पक्षाचे आमदार त्यांच्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहेत आणि पक्षात कोणत्याही प्रकारे फूट पडण्याची काडीमात्र शक्यता नाही.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रणविजय साहू म्हणाले की, “खरंतर AIMIMची विचारसरणी मुख्यमंत्र्यांपेक्षा तेजस्वी यादव यांच्याशी अधिक मिळती जुळती आहे”. या चर्चांनंतर भारतीय जनता पक्षाचे मंत्री लखेंद्र पासवान यांनी मोठा दावा केलाय, की “बरेच विरोधी आमदार सरकारच्या कामाने प्रभावित झाले असून ते सतत संपर्कात आहेत”.
2022मध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIMसोबत मोठा राजकीय गेम झाला होता. 2022 मध्ये AIMIMचे पाचपैकी चार आमदार तेजस्वी यादव यांच्या पक्ष RJDमध्ये सामील झाले होते. केवळ अमूरचे आमदार आणि AIMIM बिहारचे अध्यक्ष अख्तरुल इमान ओवेसीसोबत राहिले. उर्वरित चार आमदार – सय्यद रुकनुद्दीन अहमद (बयासी), शाहनवाज आलम (जोकीहाट), मोहम्मद इझार असफी (कोचाधामन) आणि मोहम्मद अंजार नईमी (बहादूरगंज) यांनी पक्षाला नारळ दिला होता.
एकूणच राजकीय प्रतिक्रियांमध्ये बिहारच्या राजकारणाला वेगळं वळण पात्र झालं आहे. संभाव्य फेरफार आणि युतीच्या चर्चांच्या उसळीमुळे संपूर्ण राजकीय वातावरणात घमासान पाहायला मिळत आहे. अद्याप कोणतीही फुट किंवा पक्षांतर झाल्याचे अधिकृत माहिती समोर आली नसून नेत्यांच्या वक्त्याव्यामुळे मात्र चर्चांना दुजोरा मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती कोणत्या दिशेने जाणार आणि कोणतं वळणं घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
काँग्रेस-BJP ने मिळून ठरवला महापौर, महाराष्ट्रातील ‘या’ नगरपालिकेत मिळाला एकनाथ शिंदेना झटका!






