‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ च्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतात. येत्या आठवड्यात गणेशोत्सव विशेष भागात काही खास पाहुणे कलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. हे पाहुणे कलाकार म्हणजे सारेगमप या कार्यक्रमाशी अतूट नातं असलेली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि महाराष्ट्रातातील तमाम संगीतप्रेमींचा आवडता गायक स्वप्नील बांदोडकर.
हे दोघे या मंचावर आपल्या उपस्थितीने या गणेशोत्सव विशेष भागात बहार आणणार आहेत. पल्लवी जोशी यांचं या कार्यक्रमासोबत एक विशेष नातं आहे. पंचरत्नांच्या पर्वाच सूत्रसंचालन हे पल्लवी जोशी यांनी केलं होतं आणि हीच पंचरत्न या पर्वात परीक्षकांची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे पल्लवी जोशी या मंचावर आल्याने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसंच स्वप्नील बांदोडकर देखील या लिटिल चॅम्प्सचं कौतुक करताना दिसणार आहेत. इतकंच नव्हे तर या मंचावर विराजमान झालेले बाप्पा देखील खूप खास आहेत कारण हि श्रींची मूर्ती सर्व लिटिल चॅम्प्सनी मिळून बनवली आहे. बाप्पांचा आशीर्वाद या लिटिल चॅम्प्सच्या पाठीशी सदैव असेलच यात शंका नाही.
Web Title: Special guest in saregamapa little champs on zee marathi nrst