कोरोना महामारीमुळे अनेक लोक विमानाकडे पाठ फिरवू लागले आहेत. अशा लोकांसाठी स्पाईसजेट विमान(Spicejet) कंपनीने खास सुविधा(Spicejet special Offer) सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेतल्यास तुम्ही कोरोना काळातही बिनधास्त विमान प्रवास करू शकणार आहात.
[read_also content=”कोरोना प्रतिबंधासाठी वारंवार घर निर्जंतूक करताय का ? तर मग त्याआधी हे वाचा https://www.navarashtra.com/latest-news/what-to-do-for-cleaning-home-in-corona-situation-nrsr-131270.html”]
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या लोकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. स्पाईसजेटने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांसाठी चार्टर प्लेनची सुविधा खुली केली आहे. या सुविधेचा लाभ कुणीही घेऊ शकेल. स्पाईसजेटच्या या चार्टर प्लेनचे बुकिंग कसे करायचे, किती दिवस आधी बुकिंग करता येईल, यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, हे आपण जाणून घेऊया.
स्पाईसजेटकडून चार प्रकारच्या चार्टर प्लेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून आपण एकट्याने प्रवास करू शकाल किंवा आपल्या खास लोकांसोबत प्रवासासाठी विमानाचे बुकिंग करू शकता. तुम्ही किती लोकांची तिकिटे बुक करू शकता, याबाबत स्पाईसजेटने आपल्या मेल लेटरमध्ये माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सी ९० दोन लोकांसाठी बुक केले जाऊ शकते. या विमानात ५ प्रवासी प्रवास करू शकतात आणि जवळपास ५ प्रवाशांकरीता विमानाचे बुकिंग केले जाऊ शकते. दुसरे विमान क्यू ४०० जवळपास ९० लोकांसाठी बुक केले जाऊ शकते. हे विमान सी ९० विमानापेक्षा आकाराने खूप मोठे असते. याशिवाय बोईंग ७३७ हे एक प्रवासी विमान आहे, ज्यामध्ये १०० ते २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. जर २०० लोकांना एकत्रितपणे कोठेतरी जायचे असेल तर त्यांना हे विमान बुक करणे अत्यंत सोईचे ठरेल. तसेच ए ३३०-९०० निओ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम आहे. हे विमान २०० ते ३५० प्रवाशांसाठी बुकिंग करता येऊ शकते.
स्पाईसजेटच्या या चार्टर प्लेन बुकिंगसाठी आपण अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करू शकता. तसेच आपण charters@spicejet.com वर मेल पाठवून माहिती मिळवू शकता.
स्पाईसजेट विमानात स्टेट ऑफ द आर्ट एअर सर्कुलेशन सिस्टमचा वापर केला जात आहे. याद्वारे एअर केबिनमधील वायुप्रवाह वेगळ्या प्रकारे राखला जातो. त्यामुळे हवेत फिरणाऱ्या विषाणूचा संसर्ग टाळता येतो.