सौजन्य - सोशल मिडीया
पाच तालुक्यांचा समावेश
या उपक्रमांतर्गत खेड, मावळ, मुळशी, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये सिव्हर नेटवर्क आणि प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार आहेत. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदारावर केवळ बांधकामाचीच नव्हे, तर पुढील ५ वर्षे संचालन व देखभाल आणि ५ वर्षांचा दोष दायित्व कालावधी अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.
तालुकानिहाय प्रकल्पाचा खर्च:
हवेली (८ गावे) : ३२० कोटी १६ लाख रुपये (सर्वाधिक खर्च)
मुळशी (६ गावे) : २७२ कोटी १३ लाख रुपये
शिरूर (४ गावे) : २४४ कोटी २३ लाख रुपये
खेड (७ गावे) : १३५ कोटी १० लाख रुपये
मावळ (२ गावे) : ४ कोटी ५३ लाख रुपये
नदी सुधार प्रकल्पालाही वेग
‘पीएमआरडीए’ने इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. पवना नदी सुधारणेसाठी पुढील आठवड्यात निविदा प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठळक वैशिष्ट्ये:
प्रदूषण मुक्ती : नद्या आणि ओढ्यांचे प्रदूषण कमी होऊन भूजल पातळीची गुणवत्ता सुधारेल.
वेळापत्रक : दीड महिन्याच्या निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदारांची नियुक्ती होऊन कामाला गती मिळेल.
आधुनिक तंत्रज्ञान : डिझाइन, पुरवठा आणि उभारणी अशा सर्व स्तरांवर अत्याधुनिक प्रणालीचा वापर.
हे सुद्धा वाचा : वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली






