संग्रहित फोटो
मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरातील एका २२ वर्षीय विद्यार्थिनीने शैक्षणिक तणावामधून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Mohol) केली. बुधवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमाराला अण्णा भाऊ साठेनगर येथे ही घटना घडली. साधना अनिल बनसोडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरात अण्णा भाऊ साठेनगर येथील साधना अनिल बनसोडे ही विद्यार्थिनी सोलापूर येथील एका महाविद्यालयात डीएमएलटी कोर्स करत होती. पाच वर्षांपूर्वी आजारपणामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. साधना हिला दोन विवाहित बहिणी असून, १९ वर्षाचा भाऊ आहे. ती अधूनमधून शिक्षणाच्या तणावात असायची. यातूनच तिने आत्महत्या केली.
साडीने घेतला गळफास
मोठ्या बहिणीस दरवाजा उघडत नसल्याने भाऊ विक्रांतला फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी साधना हिने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. साधना हिला तत्काळ मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत साधनाचा भाऊ विक्रांत अनिल बनसोडे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिली. हेड कॉन्स्टेबल मालती देशमुख तपास करीत आहेत.