सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या अफेअरच्या आणि डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर नेहमीच येत असतात. मात्र आता या दोघांच्या लग्नाच्या बातम्या एका बेवसाईटने दिल्यामुळे अभिनेते सुनिल शेट्टी यांचा पाराच चढला आहे.
नुकतीच सुनील यांनी अथिया आणि राहुल २०२२ मध्ये लग्न करणार असल्याची बातमी ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटवर वाचली. ही बातमी वाचल्यानंतर त्यांनी या वेब साइटला ट्रोल केले आहे.
सुनील यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “मी हे बातमी वाचली आणि मला कळलचं नाही की मी आनंदी होऊ की दुःखी. मला कळत नाही की सत्य काय आहे ते माहिती नसताना कोणी अशी बातमी कशी देऊ शकतं? अशा बेजबाबदार रिपोर्टिंमुळे पत्रकारितेचे नाव खराब होतं आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ तुम्ही अशा बातम्या कसे देऊ शकतात?,” अशी पोस्ट सुनील शेट्टी यांनी ती बातमी शेअर करत केली आहे.
Saw this article by @Bollyhungama & unsure whether to be be pained or amused. Can’t understand the need to ‘scoop’ before verifying any facts at all. This type of irresponsible reportage is what dents the credibility of journalism. ComeOn #bollywoodhungama you’re better than this https://t.co/kGzgS0qd8j
— Suniel Shetty (@SunielVShetty) January 21, 2022