
IND Vs ZIM Live: वैभवचं वादळ अन् 'सरपंच' अय्यरचा जीव पडला भांड्यात; झिम्बाब्वेचा धुव्वा अन् दणदणीत विजय
श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्यानंतर भारताने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिज खेळली. मात्र या दोन्ही सिरिजमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारत पराभूत झाला होता. श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधत होता. अखेर तो दिवस आज आला आहे. तिसऱ्या सिरिजच्या पहिल्या सामन्यात भारताने विजयाचे खाते उघडले आहे. तसेच श्रेयस अय्यरचा देखील कर्णधार मम्हणून पहिला विजय ठरला आहे.
भारतीय संघाची फलंदाजी
झिम्बाब्वेने दिलेल्या 126 रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा मैदानात आले. अभिषेक शर्मा आज जास्त रन्स करू शकला नाही. तो 1 रन करून आउट झाला. तर सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने वादळी अर्धशतक लगावले. 50 रन्समध्ये 4 फोर आणि 4 सिक्स मारत त्याने आपली वादळी खेळी केली. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने भारताचा विजय निश्चित केला.
क्रिकेटविश्व हादरलं! ‘बेबी बॉस’ Vaibhav Suryavanshi ने झिम्बाब्वेला केले उद्ध्वस्त; अर्धशतक अन्…
झिम्बाब्वेची फलंदाजी
झिम्बाब्वे संघाकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करू शकले नाहीत. बेन करनने 10 रन्सची खेळी केली. तर ब्रायन बेनेट शून्यावर आउट झाला. त्यानंतर डिओन मायर्स खेळण्यासाठी आला. तो केवळ 6 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार सिकंदर रझा देखील संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही केवळ 4 रन्सवर तो आउट झाला. रायन बरीने 26 रन्सची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. वेस्ली माधेवेरेने देखील 33 रन्सची महत्वाची खेळी केली.
IND VS ZIM Live: नुसता कहर! झिम्बाब्वेचा संघ १२५ रन्समध्ये गारद; भारत विजयाच्या उंबरठ्यावर
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.