IND Vs ZIM Live Streaming (फोटो- ट्विटर)
झिम्बाब्वेची फलंदाजी
झिम्बाब्वे संघाकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करू शकले नाहीत. बेन करनने 10 रन्सची खेळी केली. तर ब्रायन बेनेट शून्यावर आउट झाला. त्यानंतर डिओन मायर्स खेळण्यासाठी आला. तो केवळ 6 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार सिकंदर रझा देखील संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही केवळ 4 रन्सवर तो आउट झाला. रायन बरीने 26 रन्सची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. वेस्ली माधेवेरेने देखील 33 रन्सची महत्वाची खेळी केली.
In the air and taken by vice-captain Tilak Varma 🙌 Ravi Bishnoi gets number 5⃣ for #TeamIndia 👌👌 Follow the match ▶️ https://t.co/NKa0znQQ3H#ZIMvIND pic.twitter.com/DDFYqnz8FH — BCCI (@BCCI) July 23, 2026
भारताची गोलंदाजी
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. मयंक यादवने पॉवरप्लेमध्ये अचूक मारा करत 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताने अत्यंत चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. अशोक शर्माला या सामन्यात एकही विकेट प्राप्त करता आली नाही. प्रिन्स यादवने एक विकेट पटकावली. तसेच शिवम दुबेने 1 तर रवी बिश्नोईने एक विकेट घेतली.
IND Vs ZIM Live: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस; पीच रिपोर्टनुसार घेतला थेट ‘हा’ निर्णय
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.






