तृषा क्रिष्णनसह Live In मध्ये राहतोय 'मेगा स्टार' विजय थलापथी? वाढदिवसालाही केली होती खास पोस्ट, बायकोला देणार घटस्फोट
अभिनेता थलापती विजय टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये विजयची सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये गनती केली जाते. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा थलापती विजय सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत डेटिंगच्या अफवा पसरल्यानंतर अभिनेता कमालीचा चर्चेत आला आहे. विजयच्या तृषासोबतच्या डेटिंगच्या अफवा आणि पत्नी संगीता सोर्नालिंगमपासून घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत.
अंकिता-कुणालची लव्हस्टोरी कशी जुळली? ‘कोकण हार्टेड गर्ल’ने हर्षदा खानविलकरांना सांगितली लव्हस्टोरी…
गेल्या अनेक महिन्यांपासून विजय आणि तृषा यांच्या रिलेशनच्या चर्चा चाहत्यांमध्ये सुरु होत्या. त्रिशाने विजयला त्याच्या वाढदिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांचा जोर अधिक वाढला. अभिनेत्रीने जून २०२४ मध्ये थलापती विजयसोबत एक मिरर सेल्फी शेअर करत कॅप्शन दिले होते की, “वादळापूर्वीची शांतता… पुढचे अनेक टप्पे गाठण्यासाठी वादळापूर्वीची शांतता लागते” असं कॅप्शन दिलं होतं. तृषाने पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी विजय आणि त्रिशाच्या लग्नाबद्दलची जोरदार चर्चा करीत आहे. सध्या सोशल मीडियावर विजय- त्रिशाचा आणि विजय- संगीताचा असा चाहतावर्ग तयार झाला आहे. ह्या चाहतावर्गाक़डून दोघांकडून आपआपल्या आवडत्या सेलिब्रिटीची विचारपूस करत अभिनेत्यासोबतच्या रिलेशनवर चर्चा केली जात आहे.
सध्या सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये विजय आणि त्रिशाच्या रिलेशनची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये विजय आणि त्रिशाच्या रिलेशनची चर्चा असून चाहते त्यांच्या जुन्या फोटोंवर त्यांच्या रिलेशनबद्दल चर्चा करीत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय आणि त्रिशा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ‘घिल्ली’ नंतर ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. त्या अफवांमुळे दोघांनीही चित्रपटांत एकत्र काम करणे थांबवले. अफवांमुळे विजयला त्याच्या कुटुंबाने त्रिशासोबत काम करू नये असे सांगितले होते असाही अंदाज होता. १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर, या दोघांनी पुन्हा एकदा ‘लिओ’ या चित्रपटात एकत्र काम केले. विजय आणि त्रिशाच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना, असा अंदाज बांधला जात होता की तो त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगमपासून वेगळा झाला आहे. कुटुंबातील एका जवळच्या सूत्रानुसार, संगीता त्यांची मुलगी दिव्या साशाच्या शिक्षणासाठी लंडनमध्ये राहत आहे. संगीता तिच्या पालकांसोबत राहत असल्याचे वृत्त आहे आणि तिचे पालक तिला आधार देतात.