अंकिता-कुणालची लव्हस्टोरी कशी जुळली? 'कोकण हार्टेड गर्ल'ने हर्षदा खानविलकरांना सांगितली लव्हस्टोरी...
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये चर्चेत राहिलेली अंकिता वालावलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अंकिताने एन्ट्री घेतल्यानंतर काही दिवसांतच तिने रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती. अंकिता वालावलकरचा होणारा पती संगीत दिग्दर्शक आहे. त्याने ‘लक्ष्मी निवास’मालिकेच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच कुणालने सांभाळली आहे. अंकिताने नुकतीच ‘लक्ष्मी निवास’मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी तिने तिची आणि कुणालची लव्हस्टोरी कशी जुळली ? याबद्दल सांगितले आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकरांना अंकिता आणि कुणालने लग्नाची पत्रिका दिली. यानंतर दोघांचं लग्न कसं जुळलं याबद्दलही अंकिताने हर्षदा खानविलकर यांना सांगितलं. हर्षदा खानविलकर कुणालला म्हणतात, “तुझाच सेट आहे हा… तुच मालिकेचं म्युझिक करतोय तर आता सूनबाईंना लवकर घेऊन ये हा बाबा…” पुढे, अंकिता हर्षदा खानविलकर यांना त्यांचं कसं जुळलं याबद्दल सांगते, “आमचंही झी मराठीमुळेच जमलं… मी रेड कार्पेट इव्हेंट होस्ट करत होते. तेव्हाच आमची भेट झाली होती. कुणालला एका मालिकेसाठी अवॉर्ड मिळाला होता आणि त्याचवेळी मी होस्ट करत होते. आमची ओळख आधीचीच होती पण, आम्ही एकमेकांना कधी भेटलो नव्हतो. त्या इव्हेंटमध्येच आमची भेट झाली. त्यामुळेच आम्ही म्हणतो झी मराठीनेच आमचं लग्न जमवलंय…” यानंतर हर्षदा खानविलकर म्हणतात, “आपण ऋणी आहोत झी मराठीचे…”
सध्या सर्वत्रच लगीनसराई सुरु आहे. अगदी जनसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत शिवाय मालिकेतही सध्या जोरदार लगीनसराई सुरु आहे. ‘झी मराठी’च्या ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन मालिकांचा ‘महासंगम’ आजपासून (२७ जानेवारी) सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना दोन भव्यदिव्य सोहळे पाहायला मिळणार आहेत. ‘पारू’ मालिकेत किर्लोस्कर कुटुंबाकडून अनुष्का- आदित्यचा साखरपुड्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत- जान्हवीच्या लग्नाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मराठी इंडस्ट्रीला उपस्थिती लावणार आहेत. शिवाय इतर मालिकेतलेही कलाकार उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
‘आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न; ‘या’ चित्रपट आणि नाटकांनी मारली बाजी…
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हर्षदा आणि अंकिता यांचा आणखी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये अंकिता ‘लक्ष्मी’ (हर्षदा खानविलकर)ला त्यांच्या लग्नाची पत्रिका देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, ‘लक्ष्मी निवास’ लक्ष्मी अंकिताला जान्हवी आणि जयंतच्या लग्नाची पत्रिका देताना दिसते. त्यासोबतच ‘पारू’मालिकेतील अनुष्का- आदित्यच्या साखरपुड्याचेही पत्रिका देत आमंत्रण देताना दिसत आहे. ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’मालिकांचा हा महासंगम आजपासून (२७ जानेवारी)सुरू झाला आहे. आता येत्या काळात यामध्ये आणखीन कोणते ट्विस्ट अँड टर्न्स येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.