Photo Credit : Social media
नवी दिल्ली: बांगलादेशातील हिंसाचारामुळे संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे ही बांगलादेशची ही बिघडलेली परिस्थिती भारतासाठी विशेष चिंतेचे कारण आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत असताना काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. “आता जरी सर्वकाही सामान्य वाटत असले तरी भारतातही बांगलादेशासारखी हिंसक परिस्थीती उद्भवू शकते, असा दावा सलमान खुर्शीद यांनी केला आहे.
एका पुस्तकाचे प्रकाशन करताना माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले, ‘काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य वाटू शकते. इथेही सर्व काही सामान्य वाटू शकते. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही विजय साजरा करू. 2024 मधील विजय खूप सोपा होता, असा काही लोकांचा समज आहे. पण आतल्या आत काहीतरी पेटत आहे. ‘बांगलादेशात जे घडत आहे ते इथेही घडू शकते. पण आपला देश इतका मोठा आहे की इथे बांगलादेश सारखी परिस्थिती उद्भवू शकत नाही.
सलमान खुर्शीद म्हणाले की, शाहीन बागसारखी चळवळ आज देशात होऊ शकत नाही. मुस्लिम महिलांनी CAA-NRC कायद्याच्या विरोधात दक्षिण-पूर्व दिल्लीतील शाहीन बागेत केलेल्या निदर्शनांनी देशभरात अशाच निषेधांना प्रेरणा दिली. पण 100 दिवस चाललेले या आंदोलनाला खुर्शीद यांनी अपयशी ठरले, असे मी म्हटले तर आपल्यातील अनेकजण नाराज होतील. पण मला माहिती आहे. शाहीन बाग आंदोलनातील आंदोलकांसोबत काय होत आहे. त्यांच्यातील अनेक लोक आज तुरुंगात बंद आहेत. कित्येकजणांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यातील कित्येक जणांना देशाचे शत्रू म्हटले जात आहे. मी कितीही म्हटले की शाहीन बाग सारखे आंदोलन पुन्हा होईल, पण ते शक्य वाटत नाही, कारण या लोकांनी खूप सहन केले आहे.
बांगलादेशात सध्या राजकीय अस्थिरता आहे. वाढत्या विरोधामुळे शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रामुख्याने सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनांचे आता सरकारविरोधी आंदोलनात रूपांतर झाले आहे.