संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तसेच अमेरिकेतील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ४५ लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्डोमीटरनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांत १ हजार २६७ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५० हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेत कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून मृतांची संख्या दीड लाखांवर गेली आहे.
US records 1,267 new #COVID19 deaths in 24 hours, reports Johns Hopkins University: AFP news agency
— ANI (@ANI) July 30, 2020
कोरोनामुळे अमेरिकेतील रूग्णांची वाढती संख्या पाहून, येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचपाठोपाठ ब्राझिलमध्ये सुद्धा कोरोनाच्या संख्येत अधिकपटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत २५ लाख नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, ९० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच भारत देशात सुदधा गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांच्या पार गेला आहे.