मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रार्श्वभूमीवर शंभर टक्के लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना काही ठिकांणी प्रवेश नाकरले जात आहेत. असे असताना कोरोना लसीकरणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे. बिहारमधील एका वृद्धाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस (corona vaccination) घेतली. ब्रह्मदेव मंडल (वय ८४, रा. पुरैनी ब्लॉक, औरई, मधेपुरा) असे या वृद्धाचे नाव आहे.
१० महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा ब्रह्मदेव मंडल यांनी केला आहे. १२ व्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना यश मिळू शकले नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर गुडघेदुखी (Relief from knee pain) कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या लसी एकच आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकावरून घेतल्या. सरकारचे लक्ष नसल्याचे यावरून दिसून येते, असे त्यांनी म्हटले.
सीएस अमरेंद्र प्रताप शाही यांनी अहवाल मागवला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. हे खरे असेल तर दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.