भुसावळ (Bhusaval). वीजपुरवठा करणाऱ्या खांबात वीज प्रवाह उतरल्याने एक गाय आणि एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वराडसीम जोगलखोरी शिवारात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
[read_also content=”मुंबई/ मुंब्रातील अवैध गुरांच्या कत्तलीची शहानिशा करा; मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश https://www.navarashtra.com/latest-news/prove-the-slaughter-of-illegal-cattle-in-mumbra-mumbai-high-court-directs-thane-police-commissioner-nrat-159169.html”]
वराडसीम जोगलखोरी शिवारातील नरेंद्र विठ्ठलदास लठ्ठ यांच्या मालकीच्या शेतात लोखंडी वीज खांबात वीजप्रवाह उतरला. त्यात गाय आणि कमलबाई सुरेश पाटील नामक महिलेचा मृत्यू झाला.
ग्रामस्थ तसेच पदाधिकारी यांनी या घटनेबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यास माहिती कळविण्यासाठी फोन केला, पण त्यांनी फोन न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ही माहिती पोलीस पाटील सचिन वायकोळे यांनी दिली.