मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला
मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे हा शिवरायांचा पुतळा कोसळ्याचाा आरोप शिवप्रेमी करत आहेत.येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आला.
राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने निर्णय घेतल्यानंतरच राजकोट येथे पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे.
राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 35 फूटांचा होता. मालवणमधील तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांचा शाही शिक्का छापला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय नौदलछायाच्या वतीने घेण्यात आला. याचनिमित्ताने राजकोट किल्ल्यावार नौदल आणि महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.
यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे पडला. याचे आम्हाला दु:ख झाले असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. या पुतळ्यासाठी सहा महिनाभरापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करुन पुतळा उभारण्यात आला होता. जेव्हा-जेव्हा काम सुरू होते, तेव्हा स्थानिकांनीही या कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावेळी त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे.