कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कोरेगाव शहरातील काम लवकरच सुरु केले जाणार आहे. महानगरांच्या धर्तीवर विशेषत: पाश्चिमात्य देशातील रस्ते ज्या पध्दतीने आकर्षक बनवतात, त्याच पध्दतीने रस्ता बनवला जाणार आहे. जुना आराखडा आणि डिझाईन बदलण्यात आली आहे. नव्याने एक इंचही जागा बाधित होणार नाही, कोणतीही तोडफोड केली जाणार नाही, त्यासाठी नव्याने वास्तुविशारद नेमण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ अखेर शहर बदलले दिसणार असून, कोरेगावकरांनी टाकलेला विश्वास निश्चितपणे सार्थ ठरविणार आहे, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीची विकासकामे, महामार्गाचे काम आदी विषयांची आढावा बैठक आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, खटाव-माणचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसीलदार अमोल कदम, भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक डॉ. शैलेश साठे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषेदत आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरात नव्याने हाती घेत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
कोरेगावकरांनी नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे. पुसेगावातील रस्त्याचा प्रश्न समन्वयाने मार्गी लावला आहे, त्याचधर्तीवर कोरेगावातील प्रश्न सोडविला जात आहे. कोरेगावातील रस्त्याची रचना पूर्णपणे बदलली जाणार आहे. महानगरांच्या धर्तीवर विशेषत: पाश्चिमात्य देशातील रस्ते ज्या पध्दतीने आकर्षक बनवतात, त्याच पध्दतीने रस्ता बनवला जाणार आहे. जुना आराखडा आणि डिझाईन बदलण्यात आली आहे. नव्याने एक इंचही जागा बाधित होणार नाही, कोणतीही तोडफोड केली जाणार नाही, त्यासाठी नव्याने वास्तुविशारद नेमण्यात आला आहे.
आता भुयारी गटर बांधली जाणार असून, प्रत्येक शंभर मीटरवर एक पाईप टाकून, भविष्यातील नव्या जोडण्यांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. प्रशस्त रस्ता आणि त्यालगत सुमारे अडीच ते पावणे तीन मीटर जागा वापरात आणली जाणार असून, त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात येणार आहेत, असेही आमदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
साखळी पूल विस्तीर्ण होणार; पुढील ५० वर्षांचा विचार करुनच निर्णय घेण्यात आला आहे. साखळी पूल पाडण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. साखळी पूल विस्तीर्ण होणार; पुढील ५० वर्षांचा विचार करुनच निर्णयत्यापूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूस मातीचे मजबूत भराव टाकून दुचाकी व हलकी वाहने त्यावर जाऊ शकतील, असा रस्ता बनविण्यात येणार आहे. अवजड व मोठी वाहने यासाठी पर्यायी रस्त्यांचा आराखडा तयार केला जात असून, पोलीस दल आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय त्यावर अभ्यास करुन निर्णय घेणार आहेत.