भारतीय खाद्यसंस्कृती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. अनेक परदेशी पर्यटक फक्त या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी सात समुद्र पार भारतात येत असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? देशातील असेही काही पदार्थ आहेत ज्यांवर परदेशात बंदी घालण्यात आली आहे. कोणते आहेत हे पदार्थ? फोटो पहा आणि जाणून घ्या.
भारतातील 'या' पदार्थांना आहे परदेशात बंदी
पान - सुपारीच्या पानामध्ये असलेल्या कार्सिनोजेनिक पोदार्थांमुळे काही पाश्चिमात्य देशांमध्ये पान खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे
लोणचं - काही देशांनी जास्त सोडियम बेंझोएट सारखं जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असलेल्या भारतीय लोणच्यावर बंदी घातली आहे
सामोसा - भारताचा प्रसिद्ध सामोसाही काही देशांमध्ये धार्मिक श्रद्धा आणि अन्न सुरक्षेच्या करणास्थाव प्रतिबंधित आहे
नान - भारतीय पदार्थांमध्ये आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या नानला देखील काही देशांमध्ये बंदी घालण्यात आलिया आहे
गुटखा/ पान मसाला - शरीरासाठी घातक असलेला गुटखा/ पान मसाल्याला परदेशात नो एन्ट्री आहे