मुंबई : राज्यात शुक्रवारी ८३०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ९२ हजार ५८९ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ४८० झाली आहे. राज्यात २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद असून, मृतांची संख्या ११ हजार ४५२ वर पोहचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.
राज्यात २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ६२, ठाणे ११, नवी मुंबई १४, कल्याण डोंबिवली मनपा १४, भिवंडी निजामपुर मनपा १२, वसई विरार ११, रायगड ७, नाशिक २६, पुणे २८, पिंपरी चिंचवड मनपा १७, सोलापूर ९, सातार ५, जालना ४ व अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. शुक्रवारी २२१७ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत १लाख ६० हजार ३५७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १४,८४,६३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,९२,५८९ (१९.७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७,२४,६०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.