संग्रहित फोटो
औरंगाबाद : शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्या भांवाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादच्या दरकवाडी येथे उघडकीस आली आहे. अजय वाघ (वय,११) आणि पार्थ वाघ (वय,९) अशी मृतकांची नावं आहेत. ऐन सणासुदीच्या काळात घरातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
[read_also content=”उकडलेले अंड्याचे पाणी फेकता? मग ‘हे’ नक्कीच जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/throw-away-boiled-egg-water-then-definitely-know-this-nrrd-322927.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि पार्थ हे दोघंही भाऊ सोमवारी संध्याकाळच्या सुमारास शेततळ्यकडे गेले. तिथे गेल्यावर तळ्यात आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मोठ भाऊ अजय हा पाण्यात आधी उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला बुडताना पाहून लहानग्या पार्थने आरडाओरड केली आणि स्व:तही भाावाला वाचवायला पाण्यात उतरला. मात्र, त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने तो देखील बुडाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांना पाण्यातून काढले.
[read_also content=”चंद्रशेखर बावनकुळेंच्या बारामती काबीज करण्याच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/rashtrawadi-congress-spokesperson-mahesh-tapase-reply-to-chandrashekar-bawankule-nrsr-322926.html”]