सातारा : कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळण्याची कार्यवाही होणेबाबत गेले 7 दिवस झाले चालू असलेल्या आमरण उपोषणाला आज भेट दिली व आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी तात्काळ उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क करून या गावांच्या व्यथा सांगितल्या यावेळी हा पाणीप्रश्न 2 ते 3 दिवसात मार्गी लावण्याच्या बाबतीत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
वेटणे व रणसिंगवाडी या दोन्ही गावासाठी ०.१३ टी. एम. सी. पाणी उपलब्ध करुन देऊ असे ठरले आहे. या पाण्याचा उपसा करुन दोन्ही गावातील ग्रामतळी, पाझर तलाव, बंधारे कायमस्वरूपी पुर्ण क्षमतेने भरुन मिळतील असे त्यांनी आश्वासीत केले आहे. याकामी बोगद्यावरच असलेली वेटणे येथील खड़खीरा (नलवडेवस्ती) या हद्दीतील ६ एकर शासकीय जमीन (गायरान) सोलर पॅनलसाठी उपलब्ध करुन देऊ असा ठराव दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे सोलर पॅनेलवर छोटी उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करुन जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेतून विनामोबदला दोन्ही गावातील बेलमाळ तलाव, धबधबी तलाव, रणसिंगवाडी तलाव क्रमांक १ व रणसिंगवाडी तलाव क्रमांक २, खडखीरा (नलवडेवस्ती) ग्रामतळे, इनाम तलाव वेटणे, वेटणे ग्राम तलाव व दोन्ही गावातील बंधारे गरजेनुसार कायमस्वरुपी पुर्ण क्षमतेने भरून मिळावेत अशी आमची आग्रही मागणी आहे. यासर्व मागण्या विनाशर्त मंजूर करण्यासाठी काहीही करावं लागलं तरी चाले हा शब्द आम्ही यावेळी दिला.तसेच उपोषणकर्त्यांच्या जीवितास उपोषण करत असताना काही धोका झाल्यास त्यांना सर्वस्वी या जिहे कटापुर योजनेचे अधिकारी जबाबदार असतील.