किव्ह : रशिया-युक्रेन या दोन देशांमध्ये 14 दिवसांपासून युद्ध सुरूच असून रशियाचे युक्रेनवरील हल्ले कमी झालेले नाहीत. राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये आता सर्वत्र विध्वंस दिसत आहे. या सगळ्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटिश संसदेत भाषण केले आणि युक्रेन रशियन हल्ल्यांपुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले(Ukraine will not bow to Russia; Zelensky slammed Putin).
दरम्यान, झेलेन्स्की यांनी रशियाला ‘दहशतवादी देश’ म्हणून घोषित करण्याची विनंती देखील यावेळी बोलताना केली आहे. ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून कनिष्ठ सभागृह ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ला संबोधित करताना अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘ऐतिहासिक’ भाषण केले. यावेळी सर्व खासदारांनी उभं राहून झेलेन्स्की यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सहकार्याबद्दर आभारही मानले.
हार पत्करणार नाही
आता आमच्यासाठी असणे किंवा नसणे हा प्रश्न आहे. हा प्रश्न 13 दिवस विचारला गेला असता, पण आता मी तुम्हाला निश्चित उत्तर देऊ शकतो. काहीही झाले तरी आम्ही हार मानणार नाही, आम्ही हरणार नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू. समुद्रात, हवेत, आम्ही आमच्या भूमीसाठी लढू. आम्ही जंगलात, शेतात, काठावर, रस्त्यांवर लढू. रशियन सैनिकांनी युक्रेनच्या धरतीवरून निघून जावे असेही झेलेन्स्की म्हणाले.
झेलेन्स्की यांनीही नाटोमध्ये सामील होण्याची आता इच्छा राहिलेली नाही, असे म्हणत नाटो सदस्य देशांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रशियन सैन्य कीव्हच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेले असतानाही नाटो सदस्य देशांकडून कोणतंही ठोस लष्करी सहाय्य न मिळाल्याने जेलेन्स्की नाराज झाले आहेत.
दरम्यान, जागतिक घडामोडीनंतर दोन्ही देशांच्या नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतला असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही नरमाईची भूमिका घेतली असून युक्रेन सरकार हटवण्याचा कोणताही इरादा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युक्रेन सरकार उखडून फेकून द्यावं असा आमचा उद्देश नाही, असेही ते म्हणाले.
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]