लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election 2022) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना त्यांच्या मतदारसंघात कडवी झुंज मिळणार आहे. आझाद समाज पक्षाचे (Azad Samaj Party) चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) गोरखपूरमधून निवडणूक लढणार आहेत. गुरुवारी आझाद समाज पक्षाने अधिकृत घोषणा करत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून निवडणूक लढतील अशी माहिती दिली.
या घोषणेनंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करत आभार मानले. गेल्या पाच वर्षांपासून लढत असून आताही लढणार असं ते म्हणाले आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे. चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. आम्ही परिवर्तनाची लढाई लढत असल्याचं ते म्हणाले आहेत. याआधी समाजवादी पक्षासोबत युती करण्यासंबंधी त्यांची चर्चा सुरु होता. मात्र ही चर्चा पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
बहुत – बहुत आभार साधुवाद। पिछले 5 साल भी लड़ा हूँ। अब भी लड़ूंगा। जय भीम,जय मण्डल। बहुजन हिताय, बहुजन सुखाय। https://t.co/FROhXhttiv
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) January 20, 2022
[read_also content=”अनिल देशमुखांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ, सध्या आर्थर रोड कारागृहात मुक्काम https://www.navarashtra.com/maharashtra/anil-deshmukhs-judicial-custordy-extended-by-14-days-nrsr-225392/”]
याआधी चंद्रशेखर आझाद यांनी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण नंतर त्यांनी त्यावेळी पक्ष नसल्याने मायावती आणि काँग्रेस यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षाची स्थापन केल्यानंतर त्यांनी आपण योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढू असं सांगितलं होतं.
“उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून जाणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा विधानसभेत जाऊ नयेत हेदेखील महत्वाचं आहे. त्यामुळे ते जिथून लढतील तिथून मीदेखील लढणार,” असं ते म्हणाले होते.