विजय वडेट्टीवार : आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अमरावतीमध्ये होते. आज त्यांनी अमरावतीमधून माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारला धारेवर आणले आहे. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आंदोलन संपवण्याचं काम सरकारच आहे तोडगा निघू शकतो. त्यांच्या जर पार्लिमेंटचा अधिवेशन आहे त्यामध्ये आणावं आणि प्रश्न सोडवून टाकावे. सरकार तुमचं आहे तुम्हाला कोणी थांबवलं आहे. आमचा पाठिंबा आहे मराठा समाजाला आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तात्काळ हा निर्णय झाला पाहिजे न मागता, न निवेदन देता, न आंदोलन करता, न रस्त्यावर उतरता मराठा समाज ४४-४२ मोर्चे काढतो त्याला का देत नाही हा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हा निर्णय घेण्यासाठी काहीही अडचण नाही अशी सरकारला सूचना आहे.
पुढे ते म्हणाले, २०१४ मध्ये भाजप सरकारने धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण केले नाही. धनगर समाजाची मतं घेतली, त्यांना फसवण्याचं काम केलं, समाजाला फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. मराठा समाजाविषयीचा जो जीआर आता काढला तो जुनाच जीआर आहे. जुनी बाटली नवा लेबल आहे. कुठल्याही समाजाला कुठलेही प्रमाणपत्र द्यायच असेल तर त्याला तीन पिढ्यांची वंशावळ दाखल्याची गरज असते. त्यामुळे हा जीआर पूर्वी सुद्धा काढला होता, यात काहीही नवीन नाही. वंशावळ मध्ये जो बसेल तो ते पाहिलं त्याला मिळेल. हे सर्व समाजासाठी आहे केवळ मराठा, कुणबी समाजासाठी नाही असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काही रॅकेट असेल तर ते शोधून काढणे सरकारचे काम आहे. जनतेने सावधान रहायला पाहिजे. लोकांनी अशा बनवाबनवी करणाऱ्या लोकांपासून सावधान राहावं. खोटं प्रमाणपत्र पुढे टिकणार नाही असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, पंकजा मुंडे यांची यात्रा ही धार्मिक यात्रा देवदर्शनाची यात्रा आहे. देव पावल्यानंतर ताई कुठल्या दिशेने जातील हे त्यांना देव सद्बुद्धी देओ. या सगळ्या परिक्रमेतून त्यांना यश मिळो अशी सदिच्छा पंकजा मुंडे यांना विजय वडेट्टीवार यांनी दिली.