मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर खापर फोडलं होतं. पोलीस खातं सपशेल अपयशी ठरले असल्याचे विरोधकांबरोबरच खुद्द अजित पवार यांनीही म्हटलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
आता शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर तडकाफडकी डीसीपी योगेशकुमार (Yogesh kumar shunted) यांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेत निलोत्पल (dcp neelotpal) यांना नवीन कायमस्वरूपी डीसीपी म्हणून नियुक्त करण्यात आले असून गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. जे. राजभर यांचीही उचलबांगडी करत त्यांची नियुक्ती पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रुममध्ये करण्यात आली आहे.
सध्या राज्याचे गृहखाते हे सध्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील-यांच्याकडेच आहे. त्यात हे खातं राष्ट्रवादीकडे असून पोलीस प्रशासन एवढं गाफील राहिलं आणि हे आंदोलन पवारांच्या घरापर्यंत पोहोचलं त्यावरून ही टीका होत होती. शुक्रवारी शरद पवार (sharad pawar) यांच्या घराबाहेर झालेल्या आक्रमक आंदोलनावेळी पोलीस (Mumbai Police) अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरून आता मुंबई पोलीस दलात मोठा खांदेपालट करण्यात आला आहे. झोन २ चे डीसीपी योगेश कुमार यांना तिथून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या ठिकाणी निलोत्पल यांची नियुक्ती विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre-Patil) यांनी केली आहे.
[read_also content=”आज प्रभू श्रीराम जन्मोत्सव म्हणजेच ‘रामनवमी’, का साजरा केला जातो हा सण? वाचा रामरक्षा स्त्रोताचं महत्त्व https://www.navarashtra.com/lifestyle/ram-navami-2022-read-why-this-festival-is-celebrated-in-hinduism-nrak-266843.html”][blurb content=””]