अतिरेकी मांसाहार करणे ठरू शकते धोकादायक
Non Veg Foods With High Protein: प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक घटक आहेत. स्नायूंच्या विकासात, टिश्यूजची दुरुस्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात प्रोटीन हे महत्त्वाची भूमिका बजावते. मांसाहारी पदार्थ हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, परंतु त्यामध्ये पोषक तत्व जास्त प्रमाणात असते.
मांसाहारी पदार्थांचे मर्यादेत सेवन न केल्यास आरोग्यास गंभीर हानी पोहोचू शकते. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्याकडून जाणून घेऊया कोणते प्रोटीन युक्त मांसाहारी पदार्थ जे जास्त प्रमाणात खाऊ नयेत. तुम्हीही जर यापैकी कोणते मांसाहारी पदार्थ अगदी पोटाला तड लागेपर्यंत खात असाल तर वेळीच तुमची सवय सोडा आणि अधिकाधिक आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या (फोटो सौजन्य – iStock)
चिकन ब्रेस्ट
चिकन ब्रेस्ट जास्त खाण्याने होऊ शकतो त्रास
चिकन ब्रेस्ट हा प्रोटीन्सचा उत्तम स्रोत आहे आणि फिटनेस प्रेमींचा सर्वात आवडता मांसाहार मानला जातो. 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे 30-35 ग्रॅम प्रोटीन असतात. स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी हे खूप चांगले मानले जाते. परंतु जास्त चिकन खाल्ल्याने किडनीवर परिणाम होतो, विशेषत: ज्यांची किडनीि आधीच कमकुवत आहेत त्यांनी अतिरिक्त प्रोटीन खाल्ल्यास किडनीवर भार पडू शकतो, ज्यामुळे किडनी निकामी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
अंडी
प्रमाणात खावीत अंडी
प्रोटीनसह अंड्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील असतात. एका मोठ्या अंड्यामध्ये सुमारे 6-7 ग्रॅम प्रथिने असतात. पण जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. विशेषत: अंड्याचा पांढरा भाग खाल्ला जात नसेल आणि फक्त पिवळा भागच खाल्ला जात असेल तर ते आणखी घातक ठरू शकते.
हेदेखील वाचा – श्रावणात नॉनव्हेज खायची आलीये लहर? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम, होईल आजारांचा कहर
लाल मांस
लाल मांस खाण्याचे प्रमाण ठेवा नियंत्रणात
गोमांस (ज्या व्यक्ती खातात त्यांच्यासाठी) आणि मटण यांसारख्या लाल मांसामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर असते. 100 ग्रॅम मटणामध्ये सुमारे 25-30 ग्रॅम प्रथिने असतात, परंतु या मांसामध्ये भरपूर चरबीदेखील असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने कोलन कॅन्सरचा धोकाही वाढतो हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
साल्मन फिश
सॅल्मन फिॅश किती प्रमाणात खावा जाणून घ्या
साल्मन फिश ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. 100 ग्रॅम सॅल्मनमध्ये 20-25 ग्रॅम प्रोटीन असतात. मात्र, जास्त प्रमाणात सॅल्मनचे सेवन केल्याने शरीरातील पाऱ्याचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे मज्जासंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
हेदेखील वाचा – जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणे आरोग्यासाठी धोकादायक; होऊ शकतात भयंकर आजार
कोळंबी अथवा झिंगा मासा
जास्त कोळंबी खाणे ठरेल त्रासदायक
कोळंबीमध्ये प्रोटीन खच्चून भरलेले आहे आणि कॅलरीजही कमी असतात. 100 ग्रॅम कोळंबीमध्ये 20-25 ग्रॅम प्रथिने असतात. पण जास्त प्रमाणात कोळंबी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवतो. त्यामुळे तुम्हाला कितीही कोळंबी आवडत असेल तरीही तुम्ही त्याचे प्रमाणात सेवन करणे अधिक उत्तम ठरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.