(फोटो सौजन्य: istock)
चेहऱ्यावर येणारे पिंपल्स नेहमी बाहेरील घाणीचे कारण नाही तर शरीराच्या आत असलेल्या समस्यांचेही कारण असू शकते. जर शरीरात पोषकतत्वांची कमतरता असेल किंवा हार्मोन्सचे संतुलन बिघडले असेल, तर ते आपल्या त्वचेवर मुरुमांच्या रूपात दिसून येते. चला, वारंवार होणाऱ्या मुरुमांच्या कारणांविषयी काही सविस्तर जाणून घेऊया.
तापमान 40° पार? कडक उन्हातही झाडे राहतील हिरवीगार, फक्त या सोप्या घरगुती ट्रिक्सचा वापर करा
पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर पिंपल्य येण्याची कारणे?
हार्मोनल असंतुलन
हार्मोनल असंतुलन हे पिंपल्सचे मुख्य कारण ठरु शकते. यामुळे त्वचेत अतिरिक्त तेल निर्माण होऊ लागते, जे त्वचेच्या छिद्रांना बंद करते, बॅक्टेरिया वाढवते आणि परिणामी चेहऱ्यावर पिंपलची समस्या निर्माण करते.
पीसीओएस
महिलांमधील पीसीओएस किंवा मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अनेकदा हनुवटी आणि जबड्यावर पिंपल्सची समस्या वाढू लागते.
आहार
अधिक प्रमाणात साखरेचे किंवा दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या वाढू लागते. या पदार्थांमुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढते ज्यांचा परिणाम पिंपल्सच्या वाढीवर होऊ लागतो.
तणाव आणि मानसिक आरोग्य
जेव्हा आपण तणावपूर्ण वातावरणात असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढू लागते. यामुळे त्वचेतून जास्त प्रमाणात तेल बाहेर पडते आणि छिद्रे बंद होऊन पिंपल्स येऊ लागतात. तणावामुळे झोपही अपुरी राहते , ज्यामुळे त्वचेला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळत नाही.
पिंपल्स रोखण्यासाठी काय करावे?
आहारातील बदल
पिंपल्सना रोखायचे असेल तर आहारात महत्त्वपूर्ण बदल करणं फार गरजेचं ठरतं. साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमी करा. आता आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा असा प्रश्न पडत असल्यास आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करु शकता.
जास्त पाणी प्या
पाण्याचे सेवन शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. .यासाठी दररोज किमान ३-४ लिटर पाण्याचे सेवन करा. तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरते.
झोप पूर्ण करा
आपली अपूरी झोप आपल्या त्वचेवर परिणाम करत असते. तणाव कमी करण्यासाठी दररोज ७-८ तास गाढ झोप घेणे चांगले ठरते.
चेहऱ्याची स्वच्छता
चेहरा दिवसातून किमान दोनदा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही सौम्य क्लिनझर किंवा फेसवाॅशचा वापर करु शकता. चेहरा धुतल्याने यावरील घाण दूर होते आणि तेलकटपण चेहऱ्यावर साचत नाही.
डाॅक्टरांचा सल्ला
जर फार काळापासून तुम्हाला पिंपल्सची समस्या जाणवत असेल आणि अनेक उपाय करुनही काही फरक पडत नसेल तर लगेच रुग्णालय गाठा आणि यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






