वारंवार केस गळून टक्कल पडेल अशी भीती वाटते? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' प्रोटीनयुक्त लाडूचे सेवन
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, त्याप्रमाणेच त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, सतत खाज येणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी अनेक गोष्टींचा धोका वाढतो. याशिवाय आठवड्यातून दोनदा केस व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे केसांना हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळे शॅम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्ट वापरले जातात. पण केमिकलयुक्त हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केस आणखीनच खराब होऊन जातात. केसांच्या मुळांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे केस अतिशय निस्तेज होऊन जातात.(फोटो सौजन्य: Pinterest)
केसांच्या वाढीसाठी केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केसांना वरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. आहारात बदल करून केसांच्या वाढीस गुणकारी ठरणाऱ्या पदार्थांचे कायम सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या लाडूचे सेवन करावे? लाडूचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लाडूच्या सेवनामुळे केसांसोबतच शारीरिक आरोग्य सुद्धा सुधारते.
लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात तीळ, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया मंद आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्या. या बियांमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या बियांमध्ये प्रोटीन, व्हिटामीन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यानंतर भाजून घेतलेल्या बिया मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये मोरिंगा पावडर आणि आवळ्याची पावडर एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात तुम्ही खजूर सुद्धा मिक्स करू शकता. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात तूप टाकून मिक्स करा आणि लाडू बनवून घ्या. सकाळी उठल्यानंतर नियमित एक लाडूचे सेवन केल्यास केस गळणे थांबेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.
सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी बाहेर जाण्याची सवय असते. पण असे न करता नियमित एक लाडूचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय लाडू खाल्यामुळे शरीराला बायोटीन, जिंक, ओमेगा थ्री, फॅटी एसिड्स आणि आयर्न मिळेल. ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतील. केसांमधील मॉईश्चर कायमच टिकून राहते. केसांच्या निरोगी वाढीसाठी तुम्ही नियमित एक किंवा दोन लाडूचे सेवन करू शकता. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल.