लातूर: लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह कुजल्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरल्याची घटना समोर आली होती. या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा सुगावा लावला आहे.
बाल सुधारगृहातील मुलींनी काढला पळ; नीलम गोऱ्हेंनी केली कठोर कारवाईची मागणी
कसा लावला छडा?
सापडलेल्या मृतदेहाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व मिसिंग कंप्लेंट आणि किडनॅपिंग संदर्भातील सर्व प्रकरणे पडताळायला सुरुवात केली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाच पथके वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत होती. पाण्यामुळे विद्रूप झालेला चेहरा गुन्ह्याचा माग काढण्यासाठी उपलब्ध नसलेली माहिती असे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते .त्यामुळे आधी विद्रूप झालेल्या अज्ञात मृत महिलेचा चेहऱ्याचे स्केच तयार करण्यात आले .यायचा वापर करत डिजिटल चित्र तयार करण्यात आले . अखेर तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, 300 बेपत्ता तक्रारी आणि साधारण 70 च्या जवळपास किडनॅपिंग केसेस तपासल्यानंतर हत्येचा कट समोर आला.
24 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती .मृत महिलेची ओळख फरिदा खातून अशी झाली असून तिच्या पतीनेच परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयातून काही साथीदारांच्या मदतीने तिचा खून केला .तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला .आणि सुटकेस नदीकाठी फेकून दिली .अटक आरोपींमध्ये जीया उल हक (वय 34), सज्जाद जरूल अन्सारी (19), अरबाज जमलू अन्सारी (19), साकीर इब्राहिम अन्सारी (24) आणि आजम अली उर्फ गुड्डू (19) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना
गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणुका सुरू असताना चाकण परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.