आयुष्यात आलेल्या निराशावार मात करण्यासाठी कायमच वाचा Abdul Kalam यांचे मोटिव्हेशनल विचार
जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात येणाऱ्या चढ उताराना सामोरे जावे लागते. आयुष्यात कधी दुःख तर कधी सुख येते. पण जीवनात आलेल्या मोठ्या संकटामुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये जातात. मानसिक तणाव वाढल्यानंतर व्यक्ती काहीही करून घेते. त्यामुळे भावनांवर नियंत्रणात असणे आवश्यक आहे. जीवनात आलेली निराशा कायमची नष्ट करण्यासाठी तणावमुक जीवन जगणे खूप जास्त आवश्यक आहे. अशावेळी ‘मिसाईल मॅन’ आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तक वाचावीत. त्यांनी त्याच्या विचारांनी साऱ्यांचा प्रेरित केले जाते. जीवनात कोणत्याही प्रसंगी एक पडल्यासारखे किंवा मानसिक तणाव निर्माण झाल्यासारखे वाटल्यास डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार वाचावेत. यामुळे त्यांच्या विचारांमुळे कायमच प्रेरणा मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
20,000 रुपयांत पूर्ण होईल राजस्थानची सफर, अशाप्रकारे करा ट्रिपची प्लॅनिंग
पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.
जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.
जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.
सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.
यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.
हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वाना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे.
वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.
जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे ३ लोक आहेत जे ते करू शकतात. हे तीनजण म्हणजे वडील, आई आणि शिक्षक आहेत.
जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे, ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे.
जोपर्यंत भारत जगाच्या बरोबरीने उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला जागा नाही. इथे फक्त शक्ती शक्तीचा आदर करते.
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
विमानामध्ये १३ नंबर सीट का नसते? काय आहे या मागचे कारण? नक्की वाचा.
संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
एक चांगलं पुस्तक हजार मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालयाइतका मोठा असतो, त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही. – अब्दुल कलाम