जेवण न सोडता अमृता खानविलकरने 'या' सोप्या ट्रीकने केले वजन कमी
अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. अमृता कायमच तिच्या अभिनय, फिटनेस आणि सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते. तिने केवळ अभिनयामुळेच नाहीतर फिटनेस आणि जीवनशैलीने साऱ्यांचं आकर्षित केले आहे. अमृता खानविलकराचा चंद्रमुखी मराठी सिनेमा खूप गाजला होता. अमृता तिच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलद्वारे चात्यांसोबतच सतत काहींना काही शेअर करत असते. कधी मेकअप तर कधी स्किन केअर रुटीन, डाएट टीप शेअर करत असते. काही दिवसांआधी अमृताने तिच्या युट्यूब चॅनेलवर PCOD नंतरदिनचर्येत केलेले बदल, उपवास करण्याचे फायदे? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. शरीराचे शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी वेळेवर जेवण, योग किंवा ध्यान करणे किती आवश्यक आहे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य: Pinterest)
अमृताने सांगितल्यानुसार, नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. पाण्याच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो, त्वचा उजळदार दिसते. चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत, किडनी लिव्हरचे कार्य निरोगी राहते, रक्तभिसरण सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात.
सकाळी उठल्यानंतर काहींना चहा पिण्याची सवय असते, तर काहींना कॉफी पिण्याची सवय असते. पण चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी ग्रीन ज्यूस प्यावा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ग्रीन ज्युस बनवण्यासाठी काकडी, सेलेरी, पालक, हिरवे सफरचंद आणि आल्याचा बारीक तुकडा इत्यादी साहित्य वापरून तुम्ही झटपट ग्रीन ज्यूस बनवू शकता. कच्च्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित ग्रीन ज्यूस प्यायल्यास पचनक्रिया सुधरण्यास मदत होईल.
जेवल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी गरम पाण्यात जिरं आणि बडीशेपचे पावडर मिक्स करून प्यावी. या पाण्याच्या सेवनामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. बडीशेप खाल्ल्यामुळे तोंडातील दुर्गंधीपासून आराम मिळतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिरं आणि बडीशेपचे पाणी प्रभावी ठरेल.
वाढलेले वजन कमी करताना आहारात अजिबात साखरेचे सेवन करू नये. साखर खाल्ल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. ब्लॅक कॉफी शरीरासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये चांगले फॅट्स असतात. यासोबतच अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे मूड सुधारतो.