वजन कमी करण्याच्या घाईत आपण अनेकदा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, १० दिवसांत ५ किलो वजन कमी करणे शक्य आहे पण असं असलं तरीही ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं.
१० दिवसांत ५ किलो वजन कमी करणे हे एक अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक लक्ष्य आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर इतक्या कमी कालावधीत जे वजन कमी होतं, ते शरीरातील चरबी (Fat) नसते तर मुख्य म्हणजे शरीरातील पाणी आणि ग्लाइकोजन असतं.
जेव्हा आपण अचानक कडक डाएट किंवा अतिव्यायाम सुरू करतो, किंवा क्रॅश डाएट केलं जातं. अचानक कॅलरी कमी केले जातात तेव्हा सुरुवातीला कमी होणारे वजन अशा प्रकारे घटतं.
वॉटर वेट- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे वजनाचा काटा खाली येतो.
मांस पेशींचं नुकसान – फॅट बर्न होण्यापूर्वी शरीर नेहमी मसल्सना एनर्जीसाठी वापरतं.
कार्बोहाइड्रेटची कमी – स्नायूंमध्ये साठवलेली ऊर्जा (कार्बोहायड्रेट्स) खर्च झाल्यामुळे वजन कमी झाल्याचा भास होतो.
वेगाने वजन घटवल्यामुळे शरीरात अशक्तपणा येणं, डिहायड्रेशन होणं, स्नायू कमकुवत होणं आणि Metabolism बिघडण्याचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे, केवळ वजनाचा काटा पाहण्यापेक्षा Fat Loss कडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, एका आठवड्यात 0.5 ते 1 किलो वजन कमी करणं सुरक्षित मानलं जातं. त्यामुळे आरोग्यही ठीक राहतं आणि वजनही घटतं.
Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’






