अनंत अंबानीच्या शेरवानीवर हत्ती विराजमान
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह राधिका मर्चंट सोबत पार पडला. १२जुलै ला पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्यासाठी जगभरातील अनेक उद्योगपती, राजकीय नेते, सेलिब्रटी यांच्या अनेक पाहुणे उपस्थित होते. विवाह सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.राधिकाने परिधान केलेला गुजराती लेहंगा नेटकऱ्यांना देखील आवडला. मात्र अनंतच्या शेरवानीवर असलेल्या हत्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य-instagram)
विवाह सोहळ्यासाठी अनंत अंबानी यांनी परिधान केलेल्या शेरवानीवर कोरडी रुपयांचा हत्तीचा ब्रोच लावण्यात आला होता. या ब्रोचची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.अनंत अंबानींच्या शेरवानीवरील ब्रोचची किंमत १४ कोटी रुप्ये एवढी आहे. अनंत अंबानी यांचे जंगली प्राण्यांवर प्रेम आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक प्राण्याचे ब्रोच परिधान केले आहेत. मात्र लग्नात परिधान केलेल्या हत्तीच्या ब्रोचने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
अनंत अंबानीच्या शेरवानीवर हत्तीची किंमत १४ कोटी रुपये
अनंत अंबानी यांनी परिधान केलेल्या ब्रोचवर गोलाकार आणि बारीक आकाराचे हिरे आहेत. तसेच प्रसिद्ध ज्वेलरी ब्लॉगर, जिया भन्साळी यांनी ब्रोचची किंमत १४ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले आहे. याआधी त्यांनी संगीत कार्यक्रमात घातलेल्या शेरवानीवर वाघाच्या आकाराचा ब्रोच परिधान केला होता. अनंत अंबानी यांनी संगीत कार्यक्रमात अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केलेला सोन्याचे भरतकाम असलेला जॅकेट परिधान केला होता. त्यावर त्यांनी वाघाचे ब्रोच लावले होते. हा साधा सुद्धा नसून रॉयल बंगाल टायगर ब्रोच आहे.
अनंत राधिका दोघांनासुद्धा प्राण्यांची खूप आवड आहे. त्यांनी वंतारा हा प्रोजेक्ट सुरु केला असून ‘स्टार ऑफ द फॉरेस्ट’ असा त्याचा अर्थ आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशन कडून या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली आहे. गुजरातमधील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या जवळच हा नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे.