चिपळूण बस स्टँड (फोटो- सोशल मीडिया)
चिपळूण एसटी आगाराचे काम लवकर मार्गी लावणार
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आश्वासन
संपूर्ण काम धीम्या गतीने आहे सुरू
चिपळूण: गेली पाच सहा वर्षे रखडलेले चिपळूण एस टी डेपोचे काम लागणारा अधिकच्चा निधी देऊन लवकरच मार्गी लावणार असा शब्द राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांना दिला आहे. चिपळूण एस टी डेपोच्या कामाचे भूमिपूजन होऊन साधारण पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला ड आहे. या काळात ठेकेदार बदलले मात्र आहे. काम धीम्या गतीने सुरू असल्याने नाराजी या संदर्भात अनेक आंदोलने झाली मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
चव्हाण यांचा पाठपुरावा
प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी आहे . अखेर या विषयात शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी लक्ष घातले आणि थेट परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांची भेट येऊन डेपोच्या कामाचा पाढा वाचला.
विशेष बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन
प्रताप सरनाईक यांनी आचारसंहिता संपताच या विषयासाठी एक विशेष बैठक घेऊन मार्ग काढू. रखडलेल्या कामासाठी अधिकचा निधी लागल्यास त्याची देखील व्यवस्था करू पण कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर डेपोचे काम मार्गी लावू असा शब्द सरनाईक यांनी सदानंद चव्हाण यांना दिला.
‘लालपरी’च्या थांब्याचे वाजले तीनतेरा
कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आणि २४ तास बस सेवा देणारे चिपळूण बसस्थानक नव्या स्वरूपात उभे राहणार अशी मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. परंतु निधीअभावी हे काम अध्यांवर लटकले असतानाच आता इमारतीच्या हायटेक आराखड्यात बदल करून दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब रद्द करण्याचा आणि त्याऐवजी पत्रा शेड बसविण्याचा प्रस्ताव एस.टी महामंडळाकडून ठेवण्यात आला आहे. चिपळूण आगाराच्या या पत्रा प्लॅनमुळे प्रवाशांनाही तीव्र नाराजी व्यक्त करावी लागत आहे. २०१८ पासून जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा या तीन प्रमुख बसस्थानकांच्या नत्या इमारतीचे काम आहे.
‘लालपरी’च्या थांब्याचे वाजले तीनतेरा! निधीअभावी बसस्टँडचे काम ठप्प; प्रवाशांचा संताप
यातील रत्नागिरी बसस्थानकाचे काचे काम पूर्णत्वास गेले असले तरी चिपळूण येथे कधी निधीअभावी तर कधी ठेकेदार बदलामुळे काम रखडले. ७ वर्षात या बस स्थानकाचे ४० टक्के कामही पूर्णत्वास गेलेले नाही, ४ वर्षांहून अधिक काळ अर्धवट इमारत उभी राहिल्यानंतर लोखंड गंजल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सुधारणा करण्यासाठी पुन्हा काम सुरू झाले, मात्र आता हायटेक दुमजली इमारत बनवण्याचा प्लॅनच पालटला गेला. नियंत्रण कक्ष, प्रवासी सुविधा, आधुनिक कार्यालय हे सर्व ज्या दुसन्या मजल्यावर होणार होते.






