फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळामध्ये अँटी गलेयर्स लेन्स असलेल्या चष्मांचा वापर वाढला आहे. ऑफिसमध्ये दिवसभर स्क्रीनचा समोर असलेल्या लोकांमध्ये या चष्मांचा सर्रास वापर दिसून येतो. या चष्माचा हेतूही काही तसा आहे, कि आपल्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी अशा प्रकारच्या चष्म्याला फार मागणी वाढली आहे. डोळ्यांना स्क्रीनच्या अतिवापरामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवचन ठेवणे आणि त्यापासून होणारे नुकसान टाळणे, असे लेन्सवाले चष्मे वापरण्याचा मुख्य उद्देश आहे. लॅपटॉप असो वा PC, यांच्यापासून निघणारे किरणे आपल्या डोळ्यांसाठी फार घातक असतात, त्यामुळे अशा भयंकर किरणांपासून स्वतःला वाचवण्यासाठी लोक अँटी ग्लेअर ग्लासेस घालण्यास पसंती देतात.
हे देखील वाचा : चीनमधील रहस्यमय गाव! जिथे सगळेच लोक ठेंगणे; लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी
अँटी ग्लेअर ग्लासेसबद्दल अनेक प्रश्न नेहमी विचारले जाते कि अशा प्रकारचे चष्मे खरंच फायद्याचे आहेत कि फक्त डोळयांमध्ये जाणारी घाण अडवून धरण्यासाठी याचा वापर केला जातो. एंटी-ग्लेयर चष्मे आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. या चष्म्याचा फायदा नक्की असतो तरी काय? चला तर मग जाणून घेऊयात.
अँटी ग्लेअर ग्लासेसचा सर्वात महत्वाचा फायदा, मुळात हा चष्मा वापरण्याचा मुख्य हेतू आहे. सूर्यापासून किंवा एखाद्या स्क्रीनपासून निघणारे किरणे, जे आपल्या डोळयांसाठी हानिकारक ठरतात, त्यांच्यापासून डोळ्यांचे संरक्षण करणे या चष्म्याचा फायदा आहे. UV किरणांमुळे डोळ्यांना होणार त्रास याने कमी होतो. वर्तमान पत्रे वाचताना, मोबाईल वापरताना तसेच गाडी चालवताना या चष्म्याचा वापर करणे सोयीस्कर ठरते. हानिकारक किरणे डोळ्यांच्या आत पोहचत नसल्याने, डोळ्यांना लवकर थकवा होत नाही. डोळ्यांना थकवा न जाणवल्याने डोकेदुखी होत नाही.
हे देखील वाचा : ऐश्वर्या रायचा आहे नणंद श्वेताशी 36 चा आकडा, नणंद-भावजयीमध्ये का होतात भांडणं, 6 मोठी कारणं
अँटी ग्लेअर ग्लासेस फार वजनाचे नसतात. इतर चष्म्याच्या तुलनेत या चष्म्याचा वजन फार हलका असतो. त्यामुळे नाकावर वजन वाटत नाही. जास्त वजन असेल तर चिडचिडेपणा येतो. याबाबतीत तसे काही घडत नाही. भर उन्हामध्ये फिरताना अशा चष्म्याचा फार फायदा होतो. यावर असलेली बारीक लेअर सूर्यकिरणांपासून आपल्या डोळ्यांचा बचाव करते. तसेच इतर चष्म्यांप्रमाणे आपल्या डोळ्यांना धूळ मातीपासून आणि शहरातील वाढत्या प्रदूषणापासून वाचवण्यात हा चष्मा प्रभावशाली आहे.






