फोटो सौजन्य: Shuttercock
आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे रहस्य आजही गूढ आहे. आज आम्ही तूम्हाला अशाच एका सहस्यमयी गावाविषयी सांगणार आहोत जिथे बहुतेक लोक ठेंगणे आहेत. या देशातील नागरिकांची उंटी 3 फूटांपेक्षा कमी आहे. या रहस्यमयी गावात बौनेपणाचे कारण आजपर्यंत शास्त्रज्ञांसाठीही एक मोठे रहस्य आहे, आज आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगमार आहोत ज्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
चीनमधील सिचुआन प्रांतातील यांगसी नावाचे गाव एक अद्वितीय आणि रहस्यमय ठिकाण आहे. या गावाची वैशिष्ट्य म्हणजे येथील बहुतेक लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी आहे. यामुळे या गावाला जगभरात “बटू लोकांचे गाव” म्हणून ओळखले जाते. यांगसी गावात सुमारे 80 लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमधील 36 जणांची उंची केवळ 2 फूट 1 इंच ते 3 फूट 10 इंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आजपर्यंत यामागचे कारण शोधण्यात त्यांना यश आलेले नाही.
ठेंगणे लोक 1911 पासून दिसण्यास सुरूवात झाली
मिळालेल्या माहितीनुसार, यांगसी गावामध्ये बटू लोक दिसण्यास 1911 पासून सुरूवात झाली. नंतर 1951 मध्ये प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर यावर अधिकृत संशोधन सुरू करण्यात आले. 1985 च्या जनगणनेनुसार या गावात 119 लोकांमध्ये लहान उंचीची समस्या नोंदवली गेली. यानंतर शास्त्रज्ञांनी या स्थितीच्या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयोग केले. गावातील पाणी, माती, अन्नपदार्थ आदींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, परंतु त्यातून शास्त्रज्ञांना कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.
काही शास्त्रज्ञांच्या मते, गावातील जमिनीत पाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांतील विषारी घटकांमुळे येथील लोकांच्या उंचीच्या वाढीवर परिणाम झाला असल्याची शक्यता आहे. तसेच, दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने या भागात विषारी वायू सोडला असावा, ज्याचा परिणामार्थ येथील लोकांची उंटी खुंटली असावी. अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याचे कोणतेही ठोस पुरावेे सापडलेले नाहीत. त्यामुळे या गावाच्या रहस्यमय परिस्थितीवर अनेक शास्त्रज्ञ एकमत नाही.
पर्यटकांना गावात येण्यास परवानगी नाही
अतिशय दुर्गम आणि अलिप्त असलेल्या या गावात बाहेरील लोकांना प्रवेश मिळण्यास बंदी आहे. स्थानिक लोक या समस्येचे कारण दुष्ट शक्तींना मानतात, ज्यामुळे बाहेरील जगाशी फारसे संपर्क केला जात नाही. गावातील रहस्यमय परिस्थितीमुळे पर्यटकांनाही येथे येण्याची परवानगी नाही. या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांमुळे यांगसी गाव हे जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि उत्सुकता असलेल्या लोकांसाठी एक रहस्यमय ठिकाण बनले आहे. आजही या गावातील लोकांची उंची वाढणे का थांबले आहे, हे एक गूढ उरलेले आहे.
हे देखील वाचा- पेंच नॅशनल पार्क: लांब चोचीच्या गिधाडांचे घर; वन्यजीव प्रेमींसाठी अनोखा अनुभव