कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कामातून किंवा इतर कारणामुळे बाहेर जाणून आल्यानंतर शरीरात जास्त थकवा जाणवतो. उन्हामुळे शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते. अशावेळी आपण शरीराला थंड ठेवण्यासाठी ताक, दही किंवा इतर थंड पदार्थ खातो. तसेच उन्हाळ्यात अपचन, गॅस, ऍसिडिर्टी यांसारख्या पोटासंबंधित समस्या जाणवतात. जर या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही गुलकंदचे सेवन करू शकता. गुलकंद खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलकंद महिनाभर टिकते.तसेच गुलकंदचे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला गुलकंद खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
गुलकंद खाण्याचे फायदे:
शरीर थंड राहते:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते. या उष्णतेपासून जर तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर तुम्ही रोजच्या आहारात गुलकंद खाऊ शकता. यामुळे पोटाची पीएच पातळी संतुलित राहून छातीतील जळजळ कमी होते.उन्हाळ्यात त्वचेवर सर्वाधिक डाग आणि फोड येतात. यावर गुलकंद उपयुक्त आहे.
[read_also content=”नाश्त्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल तर झटपट बनवा गूळ पराठा https://www.navarashtra.com/lifestyle/instantly-make-jaggery-paratha-at-home-541303.html”]
ॲसिडिटीपासून आराम मिळतो:
अपचन ऍसिडिटीचा समस्येने अनेक लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे रोज एक कप दुधासोबत गुलकंद खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवत नाही. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी गुलकंद फायदेशीर आहे.
मानसिक आरोग्य सुधारते:
मानसिकदृष्ट्या आजारी पडल्यानंतर व्यवस्थित झोप येत नाही किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात. अशावेळी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर एक चमचा गुलकंद दुधात मिक्स करून खाऊ शकता. यामुळे स्वभाव थंड राहून मानसिक आरोग्य चांगले राहते. मेंदूच्या मज्जातंतूंना आराम मिळून शांत झोप लागते.
[read_also content=”मिठाई खाण्याची इच्छा झाली असेल तर दुधापासून घरी बनवा चविष्ट कलाकंद https://www.navarashtra.com/lifestyle/make-tasty-kaalkand-from-milk-at-home-541621.html”]
डोळ्यांसाठी उपुयक्त:
गुलकंद खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्येंपासून आराम मिळतो. ऊन वाढल्याने डोळ्यांची होणारी जळजळ, खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी रोज एक चमचा गुलकंद खाल्ले पाहिजे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.