लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गुलकंद खायला खूप जास्त आवडते. गुलाबाच्या पाकळ्या आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेले गुलकंद महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गुलकंद खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
गोड पानात वापरला जाणारा गुलकंद आता तुम्ही घरीदेखील तयार करू शकता. गुलकंद आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो आणि यामुळे अनेक आजरांवर मात करता येते. वेगवगेळ्या पदार्थांमध्ये तुम्ही गुलकंदाचा वापर करू शकता.…
उन्हाळ्यात (Gulkand Eating In Summer) गुलकंदाच्या नियमित सेवनाने उष्माघात (Heatstroke), घोळणा फुटणे, भोवळ येणे अशा त्रासापासून दूर राहता येते. मासिक पाळीतील अतिरिक्त रक्तस्राव गुलकंदाने थांबण्यास मदत होतो.