Kitchen Hacks: अनेकदा आपल्या घरी बनवलेल्या चपाती या मऊ, फुगलेल्या आणि दीर्घकाळ ताज्या राहाव्यात असे आपल्याला वाटते, पण हे कसे करता येईल तेच आपल्याला कळत नाही. वास्तविक, पीठ मळण्याबाबत अनेक प्रकारच्या टिप्स दिल्या जातात, जसे की गरम पाणी घालून किंवा तूप वापरून पीठ मळणे, गव्हाचे पीठ चाळून घेणे अशा अनेक पद्धती असतात.
मात्र या लेखात आम्ही देत असणाऱ्या युक्तीने तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. तुम्ही बर्फाचे तुकडे घालून पीठ मळताना कधी ऐकले आहे का? जर नसेल तर येथे जाणून घ्या त्याचे काय फायदे आहेत आणि या पिठापासून कोणत्या प्रकारच्या चपात्या बनवल्या जातात.
[read_also content=”चपाती सफेद कशी बनवावी, सोप्या टिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/learn-how-to-make-chapatis-white-in-color-a-simple-trick-that-is-made-for-daily-meals-nrsk-533945.html”]
तुमच्याही चपाती कडक होतात का?
चपातीसाठी पीठ मळून बाजूला ठेवल्यावर ते कडक होऊन काळे होऊ लागते. यामुळे केवळ चपाती बनवण्यात अडचण निर्माण होत नाही तर चपाती कडक होतात आणि नीट फुगतही नाहीत. अशा स्थितीत पीठ मळताना बर्फाचा वापर करणे योग्य ठरते. यामुळे तुम्हाला अनेक फरक दिसून येतील. तुम्हाला नक्कीच हे वाचून आश्चर्य वाटत असेल पण किमान एकदा नक्की प्रयोग करून पाहा.
[read_also content=”शिळी चपाती खाणे उपयुक्त आहे का https://www.navarashtra.com/lifestyle/eating-stale-chapati-is-extremely-beneficial-for-health-nrrd-325756.html”]
बर्फाने कसे भिजवाल पीठ?
फुगलेल्या चपातीसाठी टिप्स