दिवसातून किमान दोन वेळा दात घासणं महत्वाचं आहे, असं दातांचे डॉक्टर कायमच सांगतात. दातांची काळजी घेण्यासाठी फक्त ब्रश करणंच नव्हे तर चांगली टुथपेस्ट वापरणं देखील तितकंच महत्वाच आहे. बाजारात दातांच्या विविध समस्येवर टूथपेस्ट मिळते. असंं असलं तरी आयुर्वेदाने अशी एक वस्तू सांगितलेली आहे, ज्याने दात घासले तर दातांचं आरोग्य सुधारतं. काय आहे ही नैसर्गिक ब्रशसारखं काम करतो, चला तर मग जाणून घेऊयात…
दातांचा काळजी घ्यायची असल्यास वेळच्या ब्रश करणं महत्वाचं आहे. आयुर्वेदात अशी एक गोष्ट आहे ती दातांसाठी फायदेशीर आहे. ते म्हणजे कडूनिंब. चवीला कडवट असलं तरी कडूनिंबाने दात घासल्यास दातांचं आरोग्य सुधारतं. कडूनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे अनेक आहेत. कडूनिंबाला आयुर्वेदात “दातांसाठी औषध” म्हणून ओळखले जाते कारण यात नैसर्गिक रोगप्रतिकारक आणि जीवाणू नाशक गुणधर्म आहेत. खाली त्याचे प्रमुख फायदे दिले आहेत:
१. जीवाणू नाशक गुणधर्म
कडूनिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक असतात. कडूनिंबाच्या काडीने दात घासल्यास तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि दातांवरील पटल (Plaque) कमी होतो.
२. दातांचे पांढरेपणा टिकवतो
कडूनिंबाच्या काडीने नियमित घासल्यास दातांवरील कडकसरपण, धूळ किंवा पिवळेपणा कमी होतो, ज्यामुळे दात नैसर्गिक पांढरे राहतात.
३. कडूनिंबाच्या काडीने दात घासल्याने दात मजबूत होतात, तसंच तोंडाची दुर्गंधी दूर होते.
४. दातांचं आरोग्य सुधारतं.
५ तोंडातील रक्तस्राव कमी करतो
कडूनिंबाची काडी वापरण्याची पद्धत सोपी आहे. ताजी काडी घेऊन तिचं टोक दातांवर हलक्या हाताने घासायचे. आठवड्यातून किमान दोनदा दिवसातून एक किंवा दोन वेळा नियमित वापरल्यास दात आरोग्य टिकते.
अशा प्रकारे, कडूनिंबाच्या काडीने दात घासणे हा एक नैसर्गिक रामबाण उपाय आहे.कडूनिंबाची काडी दातांना मजबूत बनवते, दात पांढरे ठेवते, दुर्गंधी कमी करते आणि तोंडातील आरोग्य राखते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून, हे एक संपूर्ण आरोग्यदायी उपाय मानले जाते, जो नियमित वापरल्यास दीर्घकाळ लाभदायक ठरतो.कडूनिंबाचा वापर केल्यास रासायनिक टूथपेस्ट वापरण्याची देखील गरज पडणार नाही.