Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Fan Speed While Sleeping: झोपताना पंखा किती स्पीडवर ठेवावा? ‘ही’ चूक केल्यास झोप होण्याऐवजी होईल त्रास

Best Fan Speed While Sleeping: गरमीच्या दिवसांत पंखा लावून झोपताना त्याचा स्पीड किती असावा याचे एकच ठराविक उत्तर नसते. खोलीचे तापमान, हवेतला ओलावा आणि व्यक्तीला जाणवणारा उकाडा यानुसार पंख्याचा स्पीड ठरवावा.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 02, 2026 | 05:16 PM
Best Fan Speed While Sleeping (फोटो- सोशलमीडिया)

Best Fan Speed While Sleeping (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • खोली आणि शरीराच्या आरामानुसार पंख्याचा मंद ते मध्यम स्पीड ठेवण्याचा सल्ला.
  • पंख्याची हवा थेट अंगावर न घेता संपूर्ण खोलीत फिरवावी.
  • खूप उकाडा असल्यास स्पीड वाढवता येतो; पंखा खोली थंड न करता घाम लवकर सुकवतो.
 

गरमीच्या दिवसात पंख्याशिवाय झोप लागणं कठीण आहे. घामामुळे चिपचिप होते आणि सारखी चुळबुळ होते. म्हणून बहुतेक लोक रात्री पंखा चालू करूनच झोपतात. कोणी फुल स्पीडवर ठेवतो तर कोणाला मंद हवा लागते. पण खरं तर रात्री झोपताना पंखा किती स्पीडवर असावा याचं काही एकच उत्तर नाही. तुमची खोली किती गरम आहे, हवेत किती ओलावा आहे आणि तुम्हाला किती उकाडा सहन होतो यावर सगळं अवलंबून असतं.

आराम वाटेल असाच स्पीड ठेवा

रात्री झोपताना पंखा एवढ्याच स्पीडवर ठेवा की अंगाला छान गारवा वाटेल. पण थंडी वाजता कामा नये. खूप लोक फुल स्पीडवर पंखा लावतात आणि मग मध्यरात्री थंडी वाजून जाग येते. जर तुमची खोली आधीपासूनच थंड असेल, खिडकीतून हवा येत असेल तर पंखा जास्त वेगाने लावायची गरज नाही. मंद किंवा मध्यम स्पीड एकदम पुरेसा होतो. रात्री 1-2 नंतर बाहेरचं तापमान आपोआप कमी होतं, त्यामुळे झोपताना स्पीड थोडा कमीच ठेवलेला बरा. याने झोप पण चांगली लागते आणि वीज पण वाचते. Best Fan Speed While Sleeping:

थेट अंगावर हवा घेऊ नका

बऱ्याच लोकांची सवय असते पंख्याची हवा तोंडावर घेण्याची. हे चुकीचं आहे. एकाच जागी सतत हवा लागली तर सर्दी होते, मान दुखते, घसा सुकतो. पंखा असा ठेवा की त्याची हवा पूर्ण खोलीत फिरेल. सिलिंग फॅन असेल तर त्याची हवा सगळीकडे पसरते त्यामुळे ठीक आहे. पण टेबल फॅन किंवा स्टँड फॅन असेल तर तो एका जागी स्थिर न ठेवता फिरता ठेवा. म्हणजे हवा एकाच ठिकाणी लागणार नाही आणि खोलीत हवा खेळती राहील.

खूप उकाडा असेल तर काय करायचं?

कधी कधी खोली खूपच गरम होते, दमटपणा जास्त असतो. अशा वेळी मंद पंख्याने काहीच वाटत नाही. मग मध्यम ते जास्त स्पीडवर पंखा ठेवावा लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पंखा खोलीची हवा थंड करत नाही. AC सारखं तो काम करत नाही. तो फक्त तुमच्या शरीरावरचा घाम लवकर सुकवतो आणि त्यामुळे तुम्हाला थंड वाटतं. म्हणून खोली खूपच गरम असेल तर पंख्यासोबत खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे बाहेरची हवा आत येईल.

झोप मोडते का? बघा

जर तुम्ही पंखा लावून झोपल्यावर सकाळी नाक कोरडं पडत असेल, घसा दुखत असेल, वारंवार जाग येत असेल तर समजून जा तुमचा स्पीड जास्त आहे. प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं असतं. कुणाला जास्त थंडी वाजते तर कुणाला जास्त गरम होतं. त्यामुळे दुसऱ्याचं बघून स्पीड ठरवू नका. तुम्हाला ज्यात आराम वाटेल तोच स्पीड ठेवा.

सगळ्यात चांगला उपाय म्हणजे मध्यम स्पीडवर पंखा ठेवा आणि अंगावर एक पातळ चादर घ्या. थंडी वाजली तर चादर घ्या, गरम झालं तर काढून टाका. याने झोप पण शांत लागेल आणि तब्येत पण बिघडणार नाही.

Web Title: Best fan speed while sleeping comfortable sleep rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Best Sleep
  • helathy lifestyle
  • lifestlye tips
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
1

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर
2

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
3

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
4

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.