अभिजीत सावंतच्या मुलींची अर्थासह नावे
बिग बॉस मराठीचे 5 पर्व चालू आहे आणि जवळजवळ १ महिना होत आलाय. अभिजीत सावंतने या पर्वात चांगलाच जम बसवला असून आपल्या गाण्यासह स्वभावानेही तो सर्वांची मनं जिंकताना दिसून येतोय. अभिजीतने काही वर्षांपूर्वी गाण्याचा पहिला रियालिटी शो जिंकला होता. अनेक ठिकाणी त्याचे गाण्याचे शो होत असतात. मात्र मराठी माणसांचे मन जिंकायला तो पुन्हा सज्ज झाला आणि बिग बॉसमध्ये खेळायला आला.
अभिजीतने आपल्या खेळाने आणि आपल्या चांगुलपणानेही सर्वांची मनं या चार आठवड्यात जिंकून घेतली आहेत. जसा वैयक्तिक आयुष्यात अभिजीत आहे तसाच आतही राहत असल्याचे त्याने किती तरी वेळा बोलून दाखवले आहे. त्याला कायमच घरच्यांचा आणि लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. पण तुम्हाला अभिजीतच्या कुटुंबाविषयी माहिती आहे का? (फोटो सौजन्य – @abhijeetsawant73 Instagram)
अभिजीतच्या मुली
अभिजीतचे कुटुंब
अभिजीतने पहिला रियालिटी शो जिंकला आणि त्याचे आयुष्य संपूर्ण बदलले. त्यानंतर अभिजीतचे शिल्पा एडवडकरशी लग्न झाले. अत्यंत सुखी कुटुंब असून अभिजीत आणि शिल्पाला दोन गोंडस मुली आहेत. त्याने आपल्या सोशल मीडियावर अनेकदा या दोघींचे फोटो शेअर केले आहेत. तर या दोन्ही मुलींची नावं खास आहेत.
मोठी मुलगी अहाना
अभिजीतच्या दोन गोंडस मुली
अभिजीतच्या दोन्ही मुलींची नावं अत्यंंत सुंदर आणि वेगळी असून त्यांचा अर्थही आपण जाणून घेऊया. अभिजीतच्या मोठ्या मुलीचं नाव आहाना आहे. अहाना हे एक संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ सदैव जगणारा आत्मा. अहान हे नाव हिंदू नाव आहे ज्याचा अर्थ “जागरण,” “पुनर्जन्म” किंवा “नवीन सुरुवात” असा होतो. हे भारतातील एक लोकप्रिय नाव आहे. हे नाव कॉमन असलं तरीही खूपच सुंदर आहे
स्मिरा
अभिजीतच्या लहान मुलीचं नाव स्मीरा आहे. हे अत्यंत अनकॉमन असं नाव आहे. स्मिरा अर्थात हास्य. चेहऱ्यावर सतत हास्य असणारी अशी. तसंच या नावाचा अर्थ कायम लक्षात राहणारी असाही होतो. अत्यंत वेगळे आणि युनिक असे नाव अभिजीत आणि त्याची पत्नी शिल्पाने आपल्या मुलीचे ठेवले आहे.
मुलींची युनिक नावे
मुलींसाठी निवडा युनिक नावे
मुलींची युनिक नावे
नावे | अर्थ |
आभा | नेहमी चमकत राहणारी, झळाळी |
आर्द्रा | नक्षत्र, सौंदर्य, कोणीही जिला हात लावू शकणार नाही अशी |
आद्या | सुरूवात, प्रारंभ, प्राधान्य |
सावी | लक्ष्मीचे नाव, सन्मानाने मोठी असणारी |
आरोही | संगीतातील सूर, ध्वनी |
छवी | प्रतिबिंब, एखाद्याजी सावली |
पर्णिका | लहान पान, पार्वतीचे नाव |
स्मर्णिका | लक्षात राहणारी, आकलनशक्ती |
साधिका | देवी दुर्गा, साधना करणारी व्यक्ती |
साजिरी | सुंदर, कोमल, गोंडस |
आरष्टी | पवित्र |
अधिश्री | प्राधान्य, सुरूवात करणे, सुरूवात करणारी |
इलाक्षी | सुंदर डोळ्यांची, कमलनयनी |
देविषा | देवीप्रमाणे सुंदर, देवीचे रूप |
अर्णवी | जगाची सुरूवात, पक्षी |
चित्राणी | गंगेचे रूप, गंगा नदी, गंगेचे एक नाव |
युधा | लढाईत जिंकणारी, लढाऊ राजकन्या |
द्विजा | आकाशाप्रमाणे उंच असणारी |
अत्रेयी | नदीचे नाव, आनंदी |
सायुरी | कमळ, फूल |