फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी सीजन ६ आता रोज नवीन वळणं घेत आहे. बिग बॉसच घर म्हणजे भांडण तर असणारच! यंदाच्या पर्वात रुचिताने ही बाजू योग्यरीत्या सांभाळली आहे. जिथे भांडण होतं तिथे रुचिता असतेच. तन्वी-रुचिता असुद्या, राकेश-रुचिता असुद्या किंवा करण-रुचिता, अगदी सगळ्या भांडणात रुचिता हे नाव कॉमन आहे. पण सगळ्यात महत्वाचं वळण म्हणजे एकमेकांसाठी खंबीरपणे उभी राहणारी टोळी आता तुटण्याच्या दिशेने आहे. कारण बिग बॉसच्या अधिकृत ID वर आजचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या प्रोमोमध्ये रुचिता आणि अनुश्री एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. या वादात रुचिताने हद्दच पार केली आहे. रुचिताने अनुश्रीला ‘आ..थू!’ म्हंटले आहे. एकमेकांसाठी खंबीर असणारे एकमेकांच्या विरोधात आहेत, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाचे व आश्चर्याचे ठरणार आहे. प्रोमोमध्ये अनुश्री रुचिताला समजवताना दिसत आहे. पण रुचिता तिला उलट उत्तर देत म्हणत आहे की ‘मला जे बोलायचे आहे मी तेच बोलणार’, तेव्हा अनुश्री पुन्हा तिला प्रेमाने समजवते की ‘प्रत्येकवेळी तलवार काढण्याची गरज नसते’. तेव्हा रुचिता अनुश्रीला भडकून बोलते की ‘अगं ए फुसके… तुझे हे स्टॅटिक्स घराबाहेर चालवायचं.’ आणि अनुश्रीला ‘आ…थू!’ करून निघून जाते.
हा वाद भयंकर पेटलेला आहे. दरम्यान, रुचिताने कॅप्टन्सी टास्कमध्ये करण सोनावणे तसेच राकेश बापटसोबतही भांडण केलं आहे. त्यामुळे रुचिता म्हणजे भांडण असे काही समीकरण घरात तयार होत आहे. अशामध्ये प्रोमोखाली कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी (audience) अनेक विधाने केले आहेत. अनेकांनी रुचिताच्या अशा वागण्याचा कंटाळा आला असल्याचे म्हंटले आहे तर अनेकांनी घरात रुचिता असेल तर भांडणं असतील आणि बिग बॉस पाहण्यात आणखीन मज्जा असेल असे म्हंटले आहे. काही ज्यांना रुचिताचा मुद्दा बरोबरही वाटत आहे. आजच्या भागात हे सगळे दृश्य पाहायला मिळणार असल्यामुळे, प्रेक्षकांनो ८ वाजता तयार राहा.






