ब्लड कॅन्सर लवकरात लवकर कसा ओळखावा
सध्या विविध प्रकारचे कॅन्सर वाढताना दिसून येत आहेत आणि त्यामध्ये ब्लड कॅन्सरचे नावदेखील आहे. लहान मुलांपासून ते वयस्क व्यक्तींपर्यंत कोणालाही ब्लड कॅन्सर होऊ शकतो. यामध्ये ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा यांसारख्या कर्करोगांचा समावेश होतो. या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा अस्पष्ट असतात किंवा इतर सामान्य आजारांसारखी असू शकतात, ज्यामुळे त्यांना लवकर ओळखणे कठीण होते. त्यामुळे ही लक्षणे ओळखून वेळीच तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सच्या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.विज्ञान मिश्रा यांनी ब्लड कॅन्सरची लक्षणे आणि चाचणीच्या काही सामान्य पद्धती सांगितल्या, ज्या प्रत्येकासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या लेखातून आपण प्रथम जाणून घेऊया ब्लड कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
प्रचंड थकवा
कारणाशिवाय थकवा येणे
रक्ताच्या कर्करोगाचे पहिले आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजे असाधारण थकवा. हा थकवा कोणत्याही कारणाशिवाय येतो आणि विश्रांती घेतल्यानंतरही जात नाही. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल आणि त्याचे कारण समजत नसेल, तर हे ब्लड कॅन्सरचे प्रारंभिक लक्षण असू शकते हे तुम्ही लक्षात घ्या.
सतत आजारी पडणं
ब्लड कॅन्सरमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे वारंवार संसर्ग होतो. रुग्णांना वारंवार सर्दी, फ्लू किंवा इतर संसर्ग होऊ शकतो आणि बरे होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर यातून तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचे आहे.
हेदेखील वाचा – ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे,वेळीच व्हा सावध
शरीर काळेनिळे पडणे वा रक्त वाहणे
तुमच्या शरीरावर कोणत्याही कारणाशिवाय निळ्या खुणा आढळल्यास किंवा तुमच्या नाकातून वारंवार रक्त येत असेल किंवा तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तर हे रक्ताच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. शरीरात प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास मदत होते.
स्वोलन लिफ्म नोड्स
जर तुम्हाला मान, काखेत किंवा मांडीच्या भागात लिम्फ नोड्स सुजल्या असतील तर ते लिम्फोमाचे लक्षण असू शकते, जो रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. या सुजलेल्या गुठळ्यांमुळे वेदना होत नाहीत, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वेळीच तुम्ही तपासणी करून घ्यायला हवी.
हाडं दुखणे
हाडांचे सततचे दुखणे
काही ब्लड कॅन्सर जसे की मायलोमा यामुळे तुमच्या हाडांमध्ये दुखू शकते. विशेषत: पाठ किंवा बरगड्यांमध्ये. जर तुम्हाला तुमच्या हाडांमध्ये सतत दुखत असेल तर ते गांभीर्याने घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमची पाठ दुखत असेल तर सतत काम केल्याने दुखत आहे असा विचार करून दुर्लक्ष करू नका
त्वचा पिवळी पडणे
रक्ताच्या कर्करोगामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा येतो. या अशक्तपणामुळे आणि रक्तपेशी कमी झाल्यामुळे फिकट त्वचा, श्वास लागणे आणि चक्कर येणे ही लक्षणे दिसू शकतात आणि जर ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करा. त्वचा पिवळसर पडली असेल तर पहिले डॉक्टरांना भेट द्या.
ताप आणि घाम येणे
सतत संगर्ग होऊन ताप आणि घाम येणे
कोणत्याही कारणाशिवाय ताप येणे आणि रात्री घामाने भिजणे हे देखील ब्लड कॅन्सरचे लक्षण असू शकते. ही लक्षणे वारंवार दिसून येतात आणि सतत तुम्हाला ताप येऊन रात्री घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच ब्लड कॅन्सरची तपासणी करून घ्या.
रक्ताच्या कर्करोगाच्या तपासणीची सामान्य पद्धत
कोणत्या तपासण्या कराव्यात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.