फोटो सौजन्य - Social Media
पृथीवर अथांग समुद्र पसरला आहे. या समुद्रामध्ये अनेक रहस्य आहेत. या समुद्राचा आणखीन खूप मोठा अभ्यास करणे बाकी आहे. भू तळावर जितकं काही आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त या सागराच्या पाण्यात आहे. कदाचित तेथे काही असे जीव असतील, ज्यांविषयी आपल्याला अद्याप काहीच ठाऊक नाही. तरी मानव या तळाशी जाण्याचा फार प्रयत्न करत आहे. परंतु, प्रत्येक वेळी तळ गाठताना हाच एकला प्रश्न समोर उभा होत आहे कि हाच तळ आहे कि याहून खाली प्रवास बाकी आहे? तरी सध्या नजरेत आलेली सागरातील सगळ्यात खोल जागा मरियाना ट्रेंच आहे. ही जागा प्रशांत महासागरात आहे.
पॅसिफिक महासागरातील मायकलोनियन येथे हि जागा असून येथे स्थित चॅलेंन्जर डीप या दरीची लांबी २,५५० किमी इतकी आहे. ही खोली एवढी प्रचंड आहे की माउंट एव्हरेस्ट या खाईत ठेवला तर त्याच्या शिखरावर अजूनही सुमारे 2 किमी पाणी असेल. चॅलेंजर डीप*, समुद्रसपाटीपासून अंदाजे 10,984 मीटर (सुमारे 36,037 फूट) खोल आहे.
पृथ्वीच्या प्लेट टेक्टॉनिक्स प्रक्रियेमुळे साधारणता लाखो वर्षांपूर्वी मरियाना ट्रेंचची निर्मिती झाली. पॅसिफिक प्लेट फिलिपाईन प्लेटच्या खाली सरकताना महासागराच्या तळाला खोलगट स्वरूप प्राप्त झाले, ज्यामुळे मरियाना ट्रेंचचा जन्म झाला. १८७५ मध्ये मारियाना ट्रेंचचा मोजमाप करण्यात आला. १९६० मध्ये दोन वीरांनी चॅलेंजर डीपमध्ये यशस्वी पाणबुडी प्रवास केला. या दोघांचे नाव जॅक्स पिकार्ड आणि डॉन वॉल्श असे होते. 2012 मध्ये प्रसिद्ध फिल्म निर्माता जेम्स कॅमेरॉनने एकट्याने या खोलीत प्रवास करून नवे इतिहास घडवले.
दबाव आणि अंधाराने भरलेली या जागेचे तापमान फार थंड आहे. येथे विविध प्रकारचे सुष्मजीव आहेत. येथे वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आढळून येतात. अँफिपॉड्स, सी क्यूकंबर्स, आणि काही अज्ञात प्रजातींनी येथे राहण्याचे कौशल्य मिळवले आहे. या परिसंस्थेत दबाव सुमारे 1,000 एटीएमपेक्षा अधिक आहे. इतके दबाव असल्या कारणाने येथे मानवी जीवन अशक्य आहे.
वैज्ञानिक या जागेकडे फार आकर्षित आहेत. येथे अज्ञात जीवनरूप आहे. २००९ साली या जागेला युनायटेड स्टेट्सने याला मरियाना ट्रेंच मरीन नॅशनल मॉन्युमेंट घोषित केले. मरियाना ट्रेंच हे निसर्गाच्या गूढ आणि विशाल शक्तीचे प्रतीक आहे. या जागेबद्दल अजूनही बरीच रहस्ये असून तिचा अभ्यास महासागरशास्त्र, जीवशास्त्र, आणि पृथ्वीशास्त्रासाठी अत्यंत मौल्यवान आहे. ही खाई पृथ्वीच्या अद्वितीयतेचा आणि अजूनही न उलगडलेल्या रहस्यांचा प्रत्यय देते.