प्रेमाला नाही वयाचं बंधन! आजींसाठी आजोबंच्या 'या' Gesture ने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तसे तर सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसावे का रडावे कळत नाही, तर काही असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे क्षणात आपले मन जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजोबा आजींप्रमती (पत्नी) प्रेम व्यक्त करतात दिसत आहे. त्यांच्या या कृतीने लाखो नेटकऱ्यांची मने जिंकली आहे.
असे म्हणतात प्रेमाला वयाचं बंधन नसते, हे या दृश्यातून स्पष्ट होते. केवळ प्रेम असून चालत नाही, ते प्रेम व्यक्तही करता यायला हवे. यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी, गिफ्ट्सची गरज नसते, तर अगदी छोटेसे फूल देणे किंवा कधी एखाद्या गोष्टीत एकमेकांना मदत करणे, तसेच एकमेकांचा आदर करणे यातूनही आपले प्रेम व्यक्त करता येते. तसेच प्रेम व्यक्त करत राहिले पाहिजे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजी-आजोबा ट्रेनने प्रवास करत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आजोबांनी आजींसाठी आणणले पैंजण स्वत: त्यांच्या पायात घातले आहे. यावेळी आजींच्या चेहऱ्यावरही वेगळा आनंद पाहायला मिळत आहे. आजोंबाच्या या कृतीनेच तर लोकांची मने जिंकली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @jishma_unnikrishnan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये, मला वाटले की मी प्रवास करत आहे, पण या एका छोट्याशा क्षणाने संपूर्ण आयुष्यभराचा अनुभव पाहायला मिळाल असे म्हटले आहे. यावर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तसेच अनेकांनी प्रतिक्रिया देत हेच खरे प्रेम असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने ‘पवित्र प्रेम’ असे या दृश्याचे वर्णन केले आहे, तर दुसऱ्या एकाने मलाही असेच प्रेम भेटू देत असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.