जगभरात पसरलेल्या कोविड 19 आजारानंतर अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी योग्य तो आहार घेणे आवश्यक आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर राहता येत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे रोगराई पसरते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी विविध प्रकारची सप्लिमेंट्स आणि औषधे सध्या बाजारात उपलब्ध झाली आहेत.
सतत बदलत चालेले वातावरण, चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, सतत बाहेर खाणे इत्यादी गोष्टींचा परिणामआपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे हळूहळू रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर आयुर्वेदिक उपचार, डेकोक्शन आणि गोळ्याचा देखील शरीराला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनातील या सवयी बदलणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणार नाही.(फोटो सौजन्य – iStock)
मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप सतत वापरणे:
कामानिमित्त मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. पण सतत या गोष्टींचा वापर केल्याने आरोग्याला हानी पोहचू शकते. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दीर्घकाळ मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्याने रात्री झोपल्यानंतर झोप लागत नाही. त्यामुळे अपुऱ्या झोपेने रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होत जाते.
औषधांचा दुरुपयोग:
सतत मद्यपान किंवा इतर व्यसन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. धुम्रपान केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. फुफुसांचे गंभीर नुकसान होऊन आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
अपुरी झोप:
अपुऱ्या झोपेचा आपल्या आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. थकलेल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे कमीत कमी ७ तास झोप घेणे गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
सतत बाहेरचे खाणे:
सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडून जाते. खाद्य पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचा अति वापर केल्याने आरोग्यासंबंधित स,सत्य उद्भवतात. कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत बाहेरचे पदार्थ खाऊ नये. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती बिघडू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.