चाणक्यनीतीमध्ये समाजातील अनेक घटकांवर भाष्य केले आहे. प्राचीन काळात लिहिलेल्या चाणक्यनीतीतील जीवनमूल्ये आजही आजही तितकीच कालसुसंगत आहेत. यात आचार्य चाणक्य यांनी आयुष्य कसे जगावे यासाठीचे काही मंत्र सांगितलेले आहेत. यात लिहिल्याप्रमाणे यातील गोष्टींचे आचरण केल्यास माणसाचे आयुष्य सुखकर आणि समाधानकारक जाते अशी मान्यता आहे. आचार्य चाण्यक्यांची नीती सर्वत्र प्रसिद्ध आहे. ही चाणक्यनीती वापरून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता. चाणक्यांनी जीवनातील काही सार या नितीमध्ये लिहून ठेवले आहेत.
सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी चाणक्यनीतीचे अनुसरण करणे गरजेचे आहे. आपण एका समाजामध्ये जगतो जिथे कुटुंबाबरोबरच समाजात आपला मान-सन्मान कायम कसा राहील याचा फार विचार केला जातो. एक छोटीशी चूक समाजातील तुमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवू शकते.
घरातील वादाची वाच्यता समाजात करू नये
अनेकदा घरात आपले कोणाशी ना कोणाशी वाद, मतभेद, भांडण होत असतात. पुरुषांनी घरात झालेल्या वादाची किंवा भांडणाची वाच्यता कधीही घराबाहेर समाजात करू नये. तसेच तुम्ही आपल्या पत्नीशी निगडित कोणत्याही गोष्टीबद्दल नाराज असाल तिच्या चरित्र, व्यवहार आणि सवयींबाबत कोणालाही बाहेर सांगू नका. लक्षात ठेवा, या गोष्टी सांगितल्याने त्यावेळी जरी काही झाले नाही तरी नंतर त्याचे नुकसान भोगायला लागू शकते.
अपमान झाल्याचे सांगू नका
कोणत्याही कारणांमुळे जर तुमचा कुठेही अपमान झाला असेल तर मस्करीतही याची वाच्यता कुठेही करू नका. लोक अनेकदा मस्ती-मजाकमध्ये या गोष्टी बोलून टाकतात मात्र हे योग्य नाही. अपमान झाल्याची गोष्ट हवी तितकी गुप्त ठेवावी. जरी तुमचा अपमान झाला असेल तरी तो अपमान स्वतःच गिळा आणि याची वाच्यता कुठेही होऊ देऊ नका.
पैशांच्या बाबतीत विशेष दक्षता घ्या
आयुष्यात धनाची गरज कोणाला नसते. प्रत्येकालाच श्रीमंत बनायचे असते. आजच्या काळात पैशांनाच अधिक महत्त्व आहे. अशावेळी तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत कुठी वाच्यता करू नका. असे केल्याने समाजात मान राहत नाही आणि सर्वांनाच समजते की आपल्याकडे किती संपत्ती आहे. त्यांची वाईट नजर आपल्या संपत्तीवर लागू शकते. जेव्हा एखाद्याला समजते की आपल्याकडे कमी पैसे आहेत तेव्हा ते आपल्याला टाळू लागतात.